शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बेलगंगेचे बॉयलर उद्या पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:19 IST

गेल्या दहा वर्षापासून बंद पडलेला चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखान्याचे बॉयलर सोमवार १२ रोजी पेटणार आहे.

ठळक मुद्देकाही महिन्यांपासून कारखान्यातील यंत्रणेच्या दुरूस्तीचे सुरू होते कामगिरणा परिसरात मुबलक ऊस उपलब्ध, तिनशे कामगारही सज्ज

चाळीसगाव : गेल्या दहा वर्षापासून बंद असलेल्या बेलगंगा साखर कारखान्याचे बॉयलर सोमवारी पेटणार असून परिसरात समाधानाचे वातावरण पसरले आहे. गेल्या सहा महिन्यापासून कारखान्याचे यंत्र दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु होते. सोमवारी सकाळी ११ वाजता बॉयलर अग्नि प्रदिपन सोहळा होत असल्याची माहिती चेअरमन चित्रसेन पाटील यांनी दिली.बेलगंगा साखर कारखान्याला जिल्हा बँकेने दहा वर्षापूर्वी मालकी म्हणून टाळे लावले होते. मात्र चित्रसेन पाटील यांनी लोकसहभागातून ४० कोटी रुपये उभे करुन कारखाना विकत घेऊन भूमिपुत्रांची मालकी प्रस्थापित केली. यामुळेच चाळीसगाव तालुक्यात गेल्या सहा महिन्यापासून बेलगंगेच्या चिमणीतून धूर निघण्याची प्रतिक्षा केली जात होती.गेल्या काही महिन्यांपासून कारखान्यात रोलसह, बॉयलर व विजपुरवठा विभागाचे कामकाज केले जात होते. हे काम युद्धपातळीवर सुरु असल्याने ते पुर्ण झाले. कारखान्याने सहा कोटी रुपये ऊसतोड मजुरांना अदा करुन करारही केला आहे. गिरणा परिसरात गाळपासाठी लागणारा ऊसही उपलब्ध असल्याने दरदिवशी २५०० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले जाणार आहे.तीनशे कामगारही असून ऊस उत्पादकांना परजिल्ह्यात ऊस विकण्याच्या त्रासातून देखील सुटका होणार आहे. कारखाना नावावर लागण्याच्या प्रक्रियेत हरकतींच्या सुनावणीमुळे वेळ गेला. त्यामुळेच बॉयलर पेटण्यास एक महिना उशीरच झाला असून लवकरच गव्हाणीत ऊस मोळी टाकण्याचा सोहळा होऊन प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली जाणार असल्याचेही चेअरमन पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने