शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

यावल पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेले महिलांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:16 IST

अडावद ता. चोपडा येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपायाविरूद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी गेल्या १३ आॅगस्टपासून यावल पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलेल्या तिघा महिलांचे उपोषण आज सोडण्यात आले. तक्रारीच्या फेरचौकशीचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी आमदार हरीभाऊ जावळेदेखील उपस्थित होते.

ठळक मुद्देसात दिवसांपासून सुरू होते उपोषणउपचार करवून घेण्याची विनंतीही महिलांनी धुडकावून लावली होती.

यावल जि. जळगाव : अडावद ता. चोपडा येथील पोलीस अधिकाऱ्यासह एका पोलीस शिपायाबाबत केलेल्या तक्रारीची फेरचौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून मिळाल्यानंतर गेल्या ७ दिवसांपासून येथे उपोषणाला बसलेल्या ३ महिलांनी रविवारी आपले उपोषण मागे घेतले.पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपायाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एका पोलीस पत्नीसह तीन महिलांचे येथील पोलीस ठाण्यासमोर गेल्या सात दिवसापासून उपोषण सुरू होते. त्या उपोषणाची रविवारी सांगता झाली आहे. आमदार हरीभाऊ जावळे यांच्या उपस्थीतीत नूतन पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारीची अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचेकडून फेरचौकशी करण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषणार्थी महिलांनी आपले उपोषण सोडले. यावेळी उपोषणार्थी महिलांसह एम. बी. तडवी, मुनाफ तडवी, आरपीआयचे अरूण गजरे चर्चेत सहभागी झाले होते.१३ आॅगस्टपासून उपोषणदिड महिना होवूनही पोलीस गुन्हा दाखल करीत नसल्याने १३ आॅगष्टपासून पिडीत महिलेसह तीन महिलांनी येथील पोलीस ठाण्यासमोर उपोषणास सुरवात केली होती . दरम्यान, या उपोषणार्थी महिलांची प्रकृती खालावली होती. तथापि त्यांनी उपचारार्थ दवाखान्यात दाखल होण्यास नकार दिल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी उपोषणस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. दरम्यान, रविवारी आमदार हरीभाऊ जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सातव्या दिवशी उपोषणाची सांगता झाली आहे.या प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्यासह आदिवासी बांधव व नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते.तालुक्यातील मोहराळा येथील ४० वर्षीय विवाहितेचा पती अडावद पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना पोलीस ठाण्याचे इन्चार्ज सपोनि जयपाल हिरे यांनी विवाहितेच्या घरी जावून विनयभंग केल्याचा तिचा आरोप आहे. तसेच ही विवाहिता पतीचे औषध घेण्यासाठी यावलला आली असता येथील बुरूज चौकात शिपाई कदीर शेख यांनी सपोनि हिरे यांचाच निरोप घेवून आलो असल्याचे सांगत तिला गैरनिरोप दिला होता. यावरून पोलीस पत्नीने २४ जून रोजी येथील पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द तक्रार दिली होती. या तक्रारीवर पोलीस अधिकारी यांच्यामार्फत चौकशी झाली, मात्र ती चौकशी निष्पक्ष झाली नसल्याचा पिडीत महिलेचा आरोप आहे. 

टॅग्स :agitationआंदोलन