शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

राजकीय उपेक्षेसोबत सापत्न वागणूकही

By admin | Updated: October 7, 2014 15:07 IST

पारोळा-भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या मागील वर्षीच्या पुनर्रचनेनंतर आता पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ नावारूपाला आला. भडगाव तालुका सुरुवातीपासूनच राजकीयदृष्ट्या उपेक्षित राहिला.

अशोक परदेशी ■  भडगाव

पारोळा-भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या मागील वर्षीच्या पुनर्रचनेनंतर आता पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ नावारूपाला आला. भडगाव तालुका सुरुवातीपासूनच राजकीयदृष्ट्या उपेक्षित राहिला. तालुका लहान असल्याने नेतृत्वाची संधी न मिळाल्याने हा तालुका विकासापासून लांब असल्याचे चित्र या मतदारसंघात दिसून येत आहे. 
तालुक्यातील ६३ गावांपैकी १६ गावे एरंडोल मतदारसंघास जोडली गेली. आमडदे, गिरड जि.प. गटातून एरंडोल मतदारसंघातील ही गावे असून या १६ गावांचे २६ हजार ६९१ मतदान आहे. हे मतदान कमी झाल्याने नुकसानकारक ठरत आहे. तालुक्याचे एकूण मतदान १ लाख २६३ असून यात पुरुष ५३ हजार २५३, स्त्री मतदार ४७ हजार ११ आहेत. एकूण १0७ मतदान केंद्रे असून त्यात ४७ गावांचा समावेश आहे. इतर सर्व गावे पाचोरा मतदारसंघाशी संलग्न आहेत. या निवडणुकीत तालुक्याची मतेच निर्णायक ठरणार आहेत. 
हा मतदारसंघ पाचोर्‍याशी तर संयुक्त आहेच पण बाजार समितीदेखील संयुक्त आहे. स्वतंत्र बस आगार नसून सर्व बसेस पाचोरा आगारातून सुटतात. प्रांत कार्यालयही पाचोरा येथे आहे. हा शेती व्यवसायाशी निगडित तालुका असून राजकीयदृष्ट्या उपेक्षितच आहे. नेतृत्वाची संधी न मिळाल्याने तालुका विकासाला मुकला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत दिलीप वाघ व किशोर पाटील यांच्यात सरळ लढत झाली होती. तालुक्याचाच आमदार पाहिजे, अशी सर्वपक्षीय मागणी होती. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाची आघाडीत बिघाडी झाली तर शिवसेना-भाजपाची युती तुटली. यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत. आता लढत पंचरंगी होणार आहे. राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांना पुन्हा पक्षाची उमेदवारी मिळाली आहे, तर भाजपाचे डॉ.उत्तमराव महाजन, मनसेचे डी.एम. पाटील, बसपाचे सुरेंद्र मोरे, काँग्रेसचे प्रदीपराव पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 
 
तालुक्यातून तीन उमेदवार
या वेळी काँग्रेसचे प्रदीपराव पवार यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसचे माजी जि.प. सदस्य डॉ.उत्तमराव महाजन यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपात प्रवेश केला व उमेदवारी पटकावली आहे. बसपाकडून सुरेंद्र मोरे यांनी उमेदवारी मिळवली आहे. हे तीन जण भडगाव तालुक्यातील असून भडगाव तालुक्याला नेतृत्वाची संधी मिळते की, पुन्हा पाचोरा तालुक्याकडे नेतृत्व जाते याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढत असल्याने निवडणुकीचा आखाडा चांगलाच गाजणार आहे. निवडणुकीत कोण बाजी मारतो? यावर सर्वत्र चर्चा होत आहे. उमेदवारांकडूनही जोरदार प्रचार सुरू आहे, पण कोण नेमके कोणाच्या पाठीशी जाते हे काळच ठरवेल.
 
अनेक अडचणी या कायमच
भडगाव तालुक्यातील बहुतांश नागरिक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. तालुक्याचे ठिकाण असले तरी बर्‍याच बाबतीत चाळीसगाव व पाचोरा तालुक्यावर अवलंबित्व असते. यात प्रामुख्याने महसुली कामांचा समावेश येतो. स्वतंत्र मतदारसंघ नसल्याने राजकीय नेते मंडळी निवडणूक काळापर्यंत या तालुक्याकडे लक्ष देते व नंतर दिलेली आश्‍वासने उडून जातात. वर्षानुवर्षे हेच चित्र असल्याचे लक्षात येते. त्यामुळे फारसा विकास होऊ शकलेला नाही.