शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिला बनल्या आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:36 IST

चोपडा तालुका : महिलांच्या विशेष ग्रामसभेत एकमुखी निर्णय, पोलिसांसह जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

चोपडा, जि.जळगाव : तालुक्यातील कठोरा येथील महिलांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन करीत गावात दारूबंदीचा एकमुखी निर्णय घेतला. ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, दारूबंदी विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत.गावात गावठी दारू अगदी सहज प्रत्येक भागात आठ ते दहा ठिकाणी अगदी उघड्यावर विकली जाते. यातूनच दारू पिणाºयांची संख्या गावात वाढत होती. यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले होते. याचा कहर म्हणजे तरुण पिढी व कोवळी मुलेसुद्धा दारूच्या आहारी जातानाचे चित्र दिसत होते. याचा फटका अनेकांना बसत होता. यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत सरपंच अश्विनी रवींद्र पाटील यांच्याकडे गावात दारूबंदी करण्याचा प्रस्ताव आणला. त्यास त्यांनी तत्काळ अनुमती दर्शवित महिलांची विशेष ग्रामसभा ९ रोजी संध्याकाळी चार वाजता सरपंच अश्विनी रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यात गावातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला. यात दारूमुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होत असून, आता हे बस झाले. यापुढे गावात दारू विक्री नकोच. विकणाºयाला तत्काळ पोलिसांच्या स्वाधीन करावे व भावी पिढी या दुष्टचक्रात अडकू नये, अशा भावना महिलांनी यावेळी व्यक्त करीत दारूबंदीचा एकमुखी ठराव केला.ठरावाच्या प्रती प्रशासनाकडेया ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक, दारूबंदी विभाग जळगाव यांना स्वत: ग्रामस्थांनी जाऊन दिल्या व यात जातीने लक्ष घालून दारूबंदी करावी, असे सांगितले.सभेत एक समिती गठित करण्यात आली, ती यावर देखरेख ठेवेल. त्या समितीचे अध्यक्ष सरपंच अश्विनी रवींद्र पाटील, उपाध्यक्ष रामदास कोळी, सदस्य म्हणून भरत पाटील, अरुण धनगर, रवींद्र पाटील, अरुण पाटील, देवराम पानपाटील, मुरलीधर पाटील , व पोलीस पाटील आनंदा पाटील यांचा समावेश आहे.ग्रामसभेत सरलाबाई कुसुमबाई लक्ष्मण भिल, कोमलाबाई आनंदा पानपाटील, छायाबाई गौतम पानपाटील, मंगलबाई उत्तम भिल, विजया मधुकर पाटील, अरुणाबाई इघन देवरे, जिजाबाई विठ्ठल चांभार, आशा रमेश पाटील, मंगलाबाई मच्छिंद्र धनगर, पमाबाई देविदास कोळी, रेखा गोकुळ पाटील, सरलाबाई भास्कर कोळी, आशा सुरेश सैंदाने, भुराबाई रमेश पाटील, मायाबाई रमेश कोळी, सरला भीमराव पानपाटील आदींह तिनशेवर महिलांचा समावेश होता, अशी माहिती ग्रामसेवक राजेंद्र पवार यांनी दिली.

टॅग्स :SocialसामाजिकChopdaचोपडा