शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव मनपा कर्मचाऱ्यांवर दगडांसह भाज्यांचा मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:41 IST

हॉकर्सने उगारला मनपा कर्मचाºयावर चाकू

जळगाव : शहरातील गिरणा टाकी परिसरात अनधिकृत हॉकर्सवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकावर हॉकर्सने दगडांसह कोबी व इतर फळ-भाज्यांव्दारे हल्ला करण्यासह धक्काबुक्की केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. तसेच एका हॉकर्सने मनपा कर्मचाऱ्यांवर चाकू उगारल्याने संतापलेल्या मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनीही हातात दंडुका घेत थेट ‘फिल्मी स्टाईल’ हॉकर्सला सज्जड दम दिला. मनपा कर्मचाºयांना हातही लावला तर तुरूंगाची हवा खावी लागेल असा इशारा दिला. यावादामुळे गिरणा टाकी परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत नोंद नव्हती.मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून हॉकर्सवर होणारी कारवाईची मोहीम आता हॉकर्सने हातघाईवर आणली आहे. गेल्या महिनाभरात मनपा कर्मचाºयांवर हल्ला करण्याची तिसरी घटना घडली आहे. गिरणा टाकी परिसरात दररोज ७० ते ८० हॉकर्स आपले दुकाने थाटत असल्याबाबतची तक्रार काही नागरिकांनी केली होती. या तक्रारीनंतर मंगळवारी मनपाचे पथक गिरणा टाकी परिसरात कारवाईसाठी पोहचल्यानंतर पळापळ सुरु झाली. काही हॉकर्सचा माल मनपा कर्मचाºयांनी जप्त केल्यानंतर हॉकर्स व कर्मचाºयांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळात वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. वाद वाढतच गेल्याने ज्या हॉकर्सचा माल जप्त करण्यात आला त्यापैकी काही हॉकर्सने मनपा कर्मचाºयांवर दगडफेक करायला सुरुवात केली. यात आणखीन हॉकर्स एकत्र आल्यानंतर दगडांसह कोबी व इतर फळभाज्यांचाही मारा मनपा कर्मचाºयांवर झाला.मनपा कर्मचारी व हॉकर्समध्ये झालेल्या वादामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यात हॉकर्सने दगडफेक सुरु केल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाद वाढत असल्याने ग्राहकांनीही पळापळ सुरु केली.तसेच मिळेल त्या सुरक्षित जागेवर लपण्याचा प्रयत्न केला.उपायुक्त संतोष वाहुळे हे काही वेळात घटनास्थळी दाखल झाल्यानंतरही फळ-भाज्यांचा मारा सुरुच राहिला.चाकू उगारताच उपायुक्तांचा राग झाला अनावरकाही हॉकर्सने भाजी कापण्याचा चाकू मनपा कर्मचाºयांवर उगारल्यानंतर उपायुक्त संतोष वाहुळे यांचा राग अनावर झाला. उपायुक्तांनी दंडुका हातात घेवून फिल्मी स्टाईलने हॉकर्सचा मधोमध उभे राहिले. तसेच मनपा कर्मचाºयावर हल्ला केला तर याद राखा असा सज्जड दम हॉकर्सला दिला. काही वेळात पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे पथक पोहचल्यानंतर हॉकर्सची पळापळ सुरु झाली.११ दुकाने सील, १५०हून अधिक हॉकर्सवर कारवाई...मनपाकडून सुभाष चौक, गिरणा टाकी व इस्लामपुरा भागातील सुमारे १५० हॉकर्सवर कारवाई करून, त्यांचा माल जप्त करण्यात आला. यासह गोलाणी मार्केट, बोहरा गल्ली, चौबे मार्केट भागातील ११ दुकाने मनपाकडून सील करण्यात आले. सोशल डिन्टिन्सिंगचे पालन न करणे व सम-विषम नियमांचे उल्लंघण केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव