शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वीजेपासून बचावासाठी सावध रहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:29 IST

पावसाळा सुरू होण्यासह विजांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन होण्यास सुरूवात

पावसाळा सुरू होण्यासह विजांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र मोकळ्या जागेत, झाडावर वीज कोसळून त्या ठिकाणी थांबलेल्या नागरिकांचा, गुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना दरवर्षी घडतात.भारतात वीज कोसळण्यामुळे होणारे जास्तीत जास्त मृत्यू हे शेतावर काम करणाऱ्या लोकांचे असतात. महाराष्टÑात विजेमुळे होणाºया एकूण मृत्यूपैकी ८६ टक्के मृत्यू शेतावर काम करणाºया व्यक्तींचे होतात. त्यामुळे कोसळणाºया विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी, हे समजून घेणे आवश्यक आहे. विजा चमकत असताना आसरा घेण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे बंदिस्त इमारत म्हणजेच ज्याला भिंती, छप्पर, फरशी असेल असे. उदा.घर, शाळा, कार्यालयाची इमारत आदी. तसेच धातूचे बंदिस्त वाहन म्हणजेच चारचाकी वाहन त्यातही टारपोलीनचे छत असलेली वाहने सुरक्षित नाहीत. जेव्हा डोक्यावर गडद काळे ढग जमू लागतात किंवा पहिल्यांदा वादळाचा आवाज येतो, तेव्हाच सुरक्षित आसरा शोधावा. वादळात बहुदा गुरेढोरे, माणसेही झाडाखाली गोळा होतात. आणि विजेच्या एका झटक्यात बळी पडतात. उंच, एकाकी झाडाखाली आसरा घेऊ नका. झाडामुळे कदाचित पाऊस लागणार नाही. मात्र वीज कोसळण्याची शक्यता तिथेच जास्त असते. तसेच मोकळ्या मैदानातही थांबू नका. किंवा अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका. वादळी हवा जाणवताच गुरांना गोठ्यामध्ये किंवा जिथे वीजप्रतिबंधक उपाययोजना असते, अशा सुरक्षित ठिकाणी न्यावे.-नरवीरसिंग रावल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव