भुसावळ : दीपनगर येथील वीजनिर्मिती केंद्रात बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व जण धुळे व नाशिक जिल्ह्यातील आहेत. दिनेश रमेश पाटील, अनिल आत्माराम पाटील, उमेश संजय पाटील, हर्षल दिलीप भामरे, रवींद्र श्रावण पाटील, विजय दिलीप पाटील, संदीप देवीदास पाटील, भूषण साहेबराव माळी आणि चंद्रशेखर साहेबराव पाटील अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात दीपनगरातील काही कर्मचारी सहभागी असल्याचे उघड झाले आहे. त्यांचा जबाबही नोंदविला गेला. त्यांनी बोगस नोकर भरती केल्याची बाब मान्य केल्याचीही माहिती मिळाली. प्रशासनाने या कर्मचा:यांची नावे उघड केली नाहीत. घरभेदी ‘कारकुनी’चा शॉकसहभाग लक्षात घेता अपर डिव्हिजन क्लार्क (यूडीसी) योगेश पाटील यांचा खुलासा मागविण्यात आला आहे.-माधव कोठुके, मुख्य अभियंता
दीपनगर केंद्रात बोगस नोक:यांचे
By admin | Updated: April 28, 2017 01:17 IST