शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

दिव्यांग वराला वधू ‘रक्षिता’चा आधार

By admin | Updated: April 23, 2017 13:18 IST

अशा काळातही एका सुंदर मुलीने दिव्यांग मुलाचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार करीत त्याला आधार दिला आणि त्याच्या आयुष्याची ‘रक्षिता’ बनून एक आदर्श उभा केला आहे.

ऑनलाइन लोकमत / प्रमोद ललवाणी कजगाव, जि. जळगाव, दि. 23 - सध्याच्या काळात मुलींची संख्या कमी असल्याने विवाह ठरवताना वधूपक्षास ‘भाव’ दिला जात असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर पैसे देवून मुली सून म्हणून आणल्या जातात. अशा काळातही एका सुंदर मुलीने दिव्यांग मुलाचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार करीत त्याला आधार दिला आणि त्याच्या आयुष्याची ‘रक्षिता’ बनून एक आदर्श उभा केला आहे. या कौतुकास्पद विवाहाबाबत माहिती अशी की, कजगावचे व्यापारी कल्याणमल धाडीवाल यांना तीन मुली व एक मुलगा  आहे. तीनही मुलींचे लग्न झाले. विकी धाडीवाल हा एकच मुलगा. तो एक पाय व एका हाताने दिव्यांग असल्याने विवाह जुळविण्यात अडचणी येत होत्या. वडील कल्याणमल धाडीवाल, आई रेखा  व तिन्ही बहीणीसह मेहुण्यांनी दोन वर्षापासून त्याच्या लग्नासाठी प्रय} सुरू केले होते. इतर समाजातही स्थळ पाहणे सुरू होते.  मालेगाव जि.नाशिक येथील धाडीवाल यांचे जावई कल्पेश छाजेड व संदीप छाजेड यांना मालेगाव येथील पाटील कुटुंबाबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी विवाहाचा प्रस्ताव या कुटुंबाकडे ठेवला. पाटील कुटुंबाची स्थिती साधारणच. यामुळे अॅड.श्यामकांत डी.पाटील, मुलीचे मामा ऋषीकेश पाटील, आजोबा विठ्ठल पाटील, आई वैशाली  यांच्याशी चर्चा केली. मुलाची परिस्थिती चांगली आहे पण तो दिव्यांग आहे, याची जाणीव उपवर प्रांजलला करून दिली.   प्रांजलनेही मोठय़ामनाने ती बाब स्वीकारुन या स्थळासाठी होकार दिला. मुला-मुलीचा पाहण्याचा कार्यक्रम सुरू असताना काही नातेवाईकांनी विकीला चालण्यास सांगितले असता  चालताना त्याच्या वेदना प्रांजलला  जाणवल्या व तिने त्वरित तिच्या वडिलांना प्रश्न केला की बाबा या जागेवर जर मी दिव्यांग असते आणि असे जर मला चालायला सांगितले असते तर  तुम्हास किती वेदना झाल्या असत्या. या प्रश्नाने तेथील उपस्थित चकीत झाले व  लग्नाचा होकारही निश्चित होऊन हा विवाह सोहळा पाचोरा येथे 500 जणांच्या उपस्थितीत पार पडला.  प्रांजलने दिला विकीला आधारशहनाईच्या सुरात वर-वधूचे आगमन झाले. वर-वधू स्टेजकडे जाताना प्रांजलने विकीचा हात हातात घेत त्याला आधार देत स्टेजवर नेले.  मंगलाष्टक सुरू झाले आणि विकीच्या हाताला आधार देत प्रांजलने वरमाळा आपल्या गळयात घातली.प्रांजलची बनली रक्षितामुलाचे वडील कल्याणमल व आई रेखा यांनी आता विकीची रक्षा करणारी  व त्याची काळजी वाहणारी म्हणून  प्रांजलचे नाव ‘रक्षिता’ असे ठेवल्याचे सांगितले.