शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

यावल तालुक्यातील हिंगोणा येथे पित्याचे छत्र हरविलेल्या मुलांना काकांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 18:54 IST

चार वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा अशा भावंडांच्या पित्याचे अचानक निधन झाल्याने पोरके झालेल्या या दोघांना त्यांच्या काकांनी आधार देवून आपले वारस म्हणून स्वीकारले आहे. त्यासाठी दत्तक विधान कार्यक्रमदेखील घेण्यात येवून कायद्यानुसार दत्तकपत्र तयार केले आहे. बालकांना काकांचा आधार मिळाल्याने त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुकर होण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देमुलांच्या आईने दिली संमत्तीपौराहित्य करुन शास्त्रोक्त विधीप्रमाणे दत्तक विधानकायद्यानुसारही तयार केले दत्तक विधानपत्र

रणजित भालेरावहिंगोणा, ता.यावल, जि.जळगाव : चार वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा अशा भावंडांच्या पित्याचे अचानक निधन झाल्याने पोरके झालेल्या या दोघांना त्यांच्या काकांनी आधार देवून आपले वारस म्हणून स्वीकारले आहे. त्यासाठी दत्तक विधान कार्यक्रमदेखील घेण्यात येवून कायद्यानुसार दत्तकपत्र तयार केले आहे. बालकांना काकांचा आधार मिळाल्याने त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुकर होण्यास मदत होणार आहे.हिंगोणे येथिल रहिवासी कैलास गोपाल गाजरे यांचे २०१७ मध्ये निधन झाले. यादरम्यान, त्यांची आई सपना कैलास गाजरे यांना या दोन्ही मुलांचे पालन पोषण करून सांभाळ करणे शक्य होत नव्हते. अशातच मुलांचे काका गुणवंत गोपाळ गाजरे यांना अपत्य नसल्याने आयुष्यात कुणाचा तरी सहारा व अपत्य प्रेम मिळावे या हेतूने त्यांनी आपल्याच भावाच्या दोन्ही मुलांना दत्तक घेण्याचे ठरविले. त्यानुसार, मुलांच्या आईशी चर्चा करण्यात आली. त्यांनी संमती दिल्याने दत्तक घेण्यासंदर्भात काकांनी निर्णय घेतला. त्यानुसार बुधवार दि. १५ मे रोजी पुरोहित प्रवीण जोशी यांनी पौराहित्य करुन शास्त्रोक्त विधीप्रमाणे दत्तक विधानाचा कार्यक्रम पार पाडला. मुलगी ईश्वरी ही चार वर्ष वयाची असून, मुलगा तुषार हा तीन वर्षे वयाचा आहे. आपल्याच काका-काकुंचा आधार आई-वडील म्हणून लाभणार असल्याने या मुलांचे भविष्य सुखकर होण्यास मदत होणार आहे.दत्तक विधान कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १६ मे रोजी सावदा, ता.रावेर येथे कायद्यानुसार दत्तकपत्र दुय्यम निबंधक कार्यालयात १ हजार रुपयांच्या स्टँपवर तयार करण्यात आले. त्यात मुलांची आई सपना गाजरे यांनी दत्तक वडील गुणवंत गाजरे व दत्तक आई दीपाली गाजरे यांना आपली दोन्ही मुले दत्तक दिल्याचे लिहून दिले आहे व त्यांनीसुद्धा लिहून घेतले आहे. त्याचप्रमाणे यासाठी साक्षीदार म्हणून सावदा येथील वसंत पुरुषोत्तम होले व हिंगोणा येथील किसन तुकाराम बोरोले यांच्या स्वाक्षºया आहे.पित्याचे छत्र हरविलेल्या मुलांना आपल्याच काकांनी आधार दिल्यामुळे मुलांना परकेपणा न वाटता आपल्याच घरात ते मनमोकळेपणे आनंदी राहू शकणार आहे. मुलांचे पालनपोषण व सांभाळण्याची जबाबदारी घेतलेल्या गुणवंत गाजरे व दीपाली गाजरे यांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल