आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२१ : तालुक्यातील टाकरखेडा येथे बडोदा येथून लग्नासाठी आलेल्या नामदेव हरचंद बच्छाव (५५, मूळ रा. गलवाडे, ता. अमळनेर) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. उष्माघाताबाबत वैद्यकीय सूत्रांनी दुजोरा दिला नाही.गलवाडे ता.अमळनेर येथील मूळ रहिवासी असलेले नामदेव बच्छाव हे सध्या बडोदा (गुजरात) येथे वास्तव्यास आहे. २० मे रोजी टाकरखेडा येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने बच्छाव हे या लग्नासाठी आले होते. दुपारी लग्न लागल्यानंतर बच्छाव हे गावातीलच मंदिरावर झोपले. सर्व लग्न विधी आटोपल्यानंतर गावी जायचे असल्याने नातेवाईकांनी मंदिरावर जाऊन बच्छाव यांना उठविले. मात्र ते काहीच हालचाल करीत नसल्याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भुसावळ येथेही पुणे येथील तरुणाचा लग्नातच मृत्यू झाला होता.
बडोदा येथील इसमाचा उष्माघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 13:43 IST
टाकरखेडा : लग्नासाठी आले असता घडली घटना
बडोदा येथील इसमाचा उष्माघाताने मृत्यू
ठळक मुद्देनामदेव बच्छाव टाकरखेडा येथे नातेवाईकांकडे आले होते लग्नालाकाही दिवसांपूर्वी भुसावळ येथेही पुणे येथील तरुणाचा लग्नातच मृत्यूमयत बच्छाव हे गावातील मंदिरावर झोपलेले होते