शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पावणे दोनशे वर्षांची परंपरा कायम, हळदीचा भंडारा उधळत ओढल्या बारागाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 12:12 IST

जुन्या जळगावात उत्साह

ठळक मुद्देभव्य ध्वजासह खंडेराव महाराज मंदिरास प्रदक्षिणागुढीपाडव्याच्या पूर्वीपासून तयारी

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - हळदीच्या भंडाऱ्याची उधळण, ढोल ताशांचा गजर व खंडेराव महाराज यांचा जयजयकार अशा भक्तीमय वातावरणात जुन्या जळगावमधील पांझरापोळ जलकुंभानजीक शनिवारी सायंकाळी खंडेराव महाराज यांच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला.दीडशे ते पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या या बारागाड्या ओढण्यासाठी तरुण कुढापा मंडळाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. भगत नाना रवींद्र धनगर यांनी बारागाड्या ओढल्या. तत्पूर्वी हळदीचा भंडारा उधळण्यात आला व त्यानंतर भगत धनगर यांच्या घरासमोर असलेला भव्य ३० फुटी ध्वज घेऊन भगत व त्यांच्या सहकाºयांनी खंडेराव महाराज मंदिराला प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले. त्यानंतर बारागाड्यांनाही पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. सोबत असलेला ३० फूटी ध्वज बारागाड्यांवर ठेवण्यात आला भंडाºयाची जोरदार उधळण सुरू झाली. यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले यांच्याहस्ते पूजन करण्यात येऊन बारागाड्या ओढण्यात आल्या. पांझरा पोळ चौक ते भाग्यलक्ष्मी चौकापर्यंत या बारागाड्या ओढण्यात येऊन तेथून भगत धनगर पुन्हा खंडेराव मंदिरात जाऊन तेथून घरी गेले व त्या ठिकाणी त्यांच्या हातात बांधण्यात आलेले पंचधातूचे कडे उतरविण्यात आले. या वेळी इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करण्यात आली.तरुण कुढापा मंडळाचे अध्यक्ष संदीप भावसार, उपाध्यक्ष सचिन चौधरी, सचिव राजेंद्र पाटील यांच्यासह रामचंद्र पाटील, विशाल धनगर, मुन्ना परदेशी, भैया ठाकूर, कुंदन चौधरी, नारायण कोळी, आबा चौधरी, आनंद चौधरी, डिगंबर पाटील, प्रशांत सुरडकर आदींनी सहकार्य केले.वर्षानुवर्षाची ही अखंड परंपरा सुरू असून त्यात जुन्या जळगावातील रहिवासी व शहरवासीय सहभागी झाले होते. त्यामुळे जुन्या जळगावात चैतन्याचे वातावरण होते. या परिसरातील घरांच्या गच्चीवर उभे राहून बारागाड्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती.बारागाड्या निमित्त या ठिकाणी खाद्य पदार्थासह खेळण्याच्या दुकानाही लावण्यात आल्या होत्या.गुढीपाडव्याच्या पूर्वीपासून तयारीबारागाड्यादरम्यान ठेवण्यात येणा-या ध्वजाची काठी धुण्यासाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला (कर) ती शिरागड येथे नदीपात्रात नेण्यात येते. तेथे ही काठी धुवून तेव्हापासून बारागाड्याची तयारी केली जाते.

टॅग्स :Jalgaonजळगाव