शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात दोन मद्यपी पोलिसांमध्ये बारमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 22:59 IST

 अजिंठा चौक परिसरातील एका बिअर बारमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचाºयांमध्ये मंगळवारी रात्री साडे आठ वाजता जोरदार हाणामारी झाली. यात दारुच्या बाटल्यांची तोडफोडही झाली. गुन्हे शोध पथकाच्या अन्य पोलीस कर्मचा-यांनी धाव घेऊन हा वाद मिटविला.दरम्यान,शिस्तीचे खाते समजले जाणा-या पोलीस दलातील कर्मचा-यांमध्ये अलिकडे हाणामारीच्या सातत्याने घटना घडत आहेत.

ठळक मुद्दे गुन्हेगारासोबत केली पार्टी अजिंठा चौक परिसरात रात्री ८.३० वाजताची घटनादारुच्या बाटल्यांची तोडफोड

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१:  अजिंठा चौक परिसरातील एका बिअर बारमध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचा-यांमध्ये मंगळवारी रात्री साडे आठ वाजता जोरदार हाणामारी झाली. यात दारुच्या बाटल्यांची तोडफोडही झाली. गुन्हे शोध पथकाच्या अन्य पोलीस कर्मचा-यांनी धाव घेऊन हा वाद मिटविला.दरम्यान,शिस्तीचे खाते समजले जाणा-या पोलीस दलातील कर्मचाºयांमध्ये अलिकडे हाणामारीच्या सातत्याने घटना घडत आहेत.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अजिंठा चौक परिसरात एका लॉजिंग व परमीट रुम असलेल्या या हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचा एक डी.बी.कर्मचारी अवैध धंदे चालक तसेच पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारासोबत पार्टी करायला बसला होता. हा गुन्हेगार डी.बी.च्या दुस-या कर्मचाºयाचाही जवळचा मित्र असल्याने तो देखील या हॉटेलमध्ये गेला. तू इथे कसा म्हणून त्याने या कर्मचाºयाला जाब विचारला असता त्यावरुन दोघांमध्ये शाब्दीक वाद, शिवीगाळ व नंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. प्रकार इतका वाढला की एका कर्मचाºयाने हॉटेलमधील दारुच्या बाटल्यांचीही तोडफोड केली.