चाळीसगाव, जि.जळगाव : चोरट्यांंना जणू बाप्पाच पावला की काय, अशी शंका मनात यावी, अशा मोटारसायकल चोरीच्या चार घटना गेल्या २४ तासात शहर परिसरात घडल्या आहेत.पोलिसांतर्फे चोरीची फिर्याद आॅनलाईन पद्धतीने देण्याचे सांगितले जात असून, पोलीस ठाण्यात एकाही गुन्ह्याची नोंद नाही. यामुळे वाहनधारकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयीदेखील नाराजी व्यक्त होत आहे.१७ रोजी मेहुणबारे येथील पत्रकार रईस शेख यांची पंचायत समिती कार्यालय परिसरात लावलेली मोटार सायकल (क्रमांक एमएच-१९-डीएक्स-८१७१) घेऊन चोरटे पसार झाले. ही घटना दुपारी दोन वाजता घडली. रईस शेख हे फिर्याद देण्यासाठी गेले असता, आॅनलाईन पद्धतीने फिर्याद दाखल करा, असे सांगण्यात आले.१७ रोजीच प्रशांत गायकवाड यांच्या मालकीची मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९-बीएस-७२७४) चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयातून चोरी झाली. त्यानंतर ते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. त्यांचीदेखील तक्रार पोलीसांनी नोंदवून घेतली नाही, त्यांना आॅनलाईन गुन्हा दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला.शहरातील धुळे रोडवरील विठ्ठल धनसिंग राजपूत यांच्या मालकीची मोटारसायकल (क्रमांक एमएच-१९-३७७४) सोमवारी मध्यरात्रीनंतर त्यांच्या निवासस्थानासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यांच्याशेजारीच राहात असलेले ग्रामसेवक राजेंद्र सोनवणे यांच्या निवासस्थानासमोर लावलेली मोटारसायकल चोरांनी लांबविली. त्यांनाही आॅनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवा, असे सांगण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गुन्हा नोंदवून तातडीने तपास करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
चाळीसगाव येथे चोरट्यांना बाप्पा प्रसन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 14:53 IST
२४ तासात चार मोटारसायकल लांबवल्या
चाळीसगाव येथे चोरट्यांना बाप्पा प्रसन्न
ठळक मुद्देगुन्हा आॅनलाईन नोंद करण्याचा पोलिसांनी दिला सल्लाएकाही मोटारसायकलचा तपास नाही मोटारसायकलचालक झाले परेशान