शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

२७ मार्च रोजी बँकांचा संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 11:37 IST

जळगाव : सरकारी बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाविरुद्ध आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र एम्पॉईज् असोसिएशन व आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र ...

जळगाव : सरकारी बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाविरुद्ध आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र एम्पॉईज् असोसिएशन व आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स असोसिएशनच्यावतीने २७ मार्च रोजी संप पुकारण्यात आला आहे.बँक कर्मचाऱ्यांचा वेतन करार रखडल्याने त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ११ ते १३ मार्च दरम्यान संप पुकारण्यात आला होता. मात्र आता तो मागे घेण्यात आला आहे. त्यानंतर आता सध्या कार्यरत असलेल्या दहा सरकारी बँकाचे त्यांच्याहून सक्षम असलेल्या चार सरकारी बँकांमध्ये विलिनीकरण करण्याच्या योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. येत्या १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. त्या विरोधात दोन्ही संघटनांच्यावतीने २७ मार्च रोजी संप पुकारला असल्याची माहिती असोसिएशनचे नाशिक विभागाचे उपाध्यक्ष मोहन खेवलकर यांनी दिली. सध्या बँकांचे विलिनीकरण व त्या नंतर बँकांचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा हेतू असल्याने हा निर्णय घातक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.मार्चमधील उर्वरित २२ दिवसांपैकी ८ दिवस बँका बंदमार्च महिन्याच्या उर्वरित २२ दिवसांपैकी तब्बल आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये १० मार्च रोजी धुलीवंदनची सुट्टी असून १४ मार्च रोजी दुसरा शनिवार, १५ व २२ रोजी रविवार, २५ रोजी गुढीपाडव्याची सुट्टी, २७ रोजी संप, २८ रोजी चौथा शनिवार व २९ रोजी रविवार आहे. त्यामुळे या महिन्यात १० मार्चपासून महिनाअखेरपर्यंत ८ दिवस बँका बंद राहणार आहेत.

टॅग्स :bankबँकJalgaonजळगाव