शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा परिषदेचे बँक खाते सील, न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:47 IST

शेतक-यांचे भूसंपादनाचे पैसे न दिल्याने कारवाई

ठळक मुद्देजिल्हाधिका-यांचे वाहन होणार जप्तदोन-तीन दिवसात दीड कोटी रुपये मिळणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13-  भूसंपादनाचे पैसे संबंधित शेतक-यांना न दिल्याने जिल्हा परिषदेचे जिल्हा बँकेतील करंट खाते न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी सिल करण्यात आले आहे.  या निर्णयामुळे जि. प. ची नामुष्की झाली असून त्यांच्या विविध  आर्थिक व्यवहारांना ‘ब्रेक’ लागला  आहे. या प्रकरणाबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कुरंगी आणि जामनेर तालुक्यातील शहापूर येथील  जमीनी पाटबंधारे विभागाने भुसंपादन केल्यानंतरही जिल्हापरिषदेने जमिनीच्या  मोबदल्यांची 1 कोटी 66 लाख रुपये इतकी रक्कम बरेच दिवस होवूनही संबंधित शेतक-यांना दिलीच नाही. यापैकी कुंरगी येथील 27 लाखांच्या वसुलीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हापरिषदेचे हे बँक खाते सील केले असल्याची माहिती  शेतक-यांचे वकील अॅड. एन. आर. लाठी यांनी दिली.  हे आदेश 4 दिवसांपूर्वी दिले होते तर त्यावर शुक्रवारी 12 रोजी कार्यवाही झाली. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे पगार, कंत्राटदारांचे धनादेश, पेन्शनचे व्यवहार आदींना अडसर निर्माण झाला आहे. या थकीत मोबदल्यासाठी  यापुर्वीही न्यायालयाच्या आदेशानुसार सिंचन विभागातील संगणक तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वाहन जप्तीची कारवाई झाली होती. त्याचवेळी बँक खाते सील करण्याचा इशारा अॅड. लाठी यांनी दिला होता. मात्र मुदत देऊनही दीड महिना उलटला तरी रक्कम देण्यास जिल्हापरिषद प्रशासनाने टाळाटाळ केल्याने ही कारवाई झाली. सील केलेल्या खात्यात सुमारे 17 कोटीची रक्कम शिल्लक असुन त्यातुन पात्र लाभार्थांना रक्कम अदा केली जाणार असून या खात्यातील काढण्याचा निर्णय 15 जानेवारीला होणार असल्याचेही लाठी यांनी सांगितले. दोन-तीन दिवसात पैसे मिळणार शेतक:यांना त्यांच्या हक्काचे पैसे  देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहेच. ही देणी अदा करण्यासाठी जि. प. तर्फे सरकारकडे पैशाची मागणी केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार दोन-तीन दिवसात दीड कोटी रुपये मिळणार असून हा विषय तेव्हा लगेच मार्गी लावला जाईल, अशी माहिती जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.जिल्हाधिका-यांचे वाहन होणार जप्तमुंदखेडा तसेच पातोंडा येथील 80 लोकांचेही भूसंपादनाचे 54 कोटी घेणे असून  या प्रकरणातह तापी महामंडळ, लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीचे आदेश गुरुवारी काढले असल्याची माहितीही अॅड. लाठी यांनी दिली. यानुसार तीन- चार दिवसात जिल्हाधिकारी यांची कार जप्त करण्यात येणार आहे. तसेच इतर दोन्ही कार्यालयातही जप्तीची कारवाई केली जाईल, असेही लाठी यांनी सांगितलेर्.