क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसऱ्या दिवशी मिळतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 01:01 AM2020-02-01T01:01:24+5:302020-02-01T01:02:23+5:30

शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या २२ बँकांच्या शाखा आहेत. १९ विविध प्रकारच्या बँक चोपडा शहरात आहेत. मात्र क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसºया दिवशी पैसे मिळतात.

 Bank account holders receive money on the third day due to a clearance house | क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसऱ्या दिवशी मिळतात पैसे

क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसऱ्या दिवशी मिळतात पैसे

Next
ठळक मुद्देचोपडा तालुक्यातील खातेदारांचे हालक्लिअरन्स हाऊस चोपड्यात असणे गरजेचे

संजय सोनवणे
चोपडा, जि.जळगाव : शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या २२ बँकांच्या शाखा आहेत. १९ विविध प्रकारच्या बँकचोपडा शहरात आहेत. मात्र क्लिअरन्स हाऊसअभावी बँक खातेदारांना तिसºया दिवशी पैसे मिळतात. यामुळे तालुक्यातील खातेदारांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.
चोपडा शहरासह तालुक्यातील या सर्व बँकांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून तालुक्यात आर्थिक व्यवहार आणि उलाढाल बघता येथे शाखा स्थापन केल्या आहेत. मात्र खातेदारांना धनादेशाद्वारे जर पैसे दुसºया बँकेतून आपल्या खाती वर्ग करायची असतील तर त्यासाठी येथील स्टेट बँकेत अथवा एचडीएफसी बँकेत धनादेश क्लिअरन्स हाऊस असणे अत्यावश्यक आहे. असे असताना हे हाऊस येथे स्टेट बॅँकेच्या शाखाही सुरू करीत नाही आणि एचडीएफसी बँकेला ही असे केंद्र सुरू करण्यासाठी ना हरकत स्टेट बँकेकडून दिली जात आहे म्हणून धनादेश वटायला तिसरा दिवस उजाडतो. त्यामुळे बँक खातेदाराला त्याचे पैसे असल्यावरही ताटकळत थांबावे लागते. धनादेश जमा केल्यानंतर तिसºया दिवशी ते पैसे उपयोगात येतात आणि क्लिअरन्स हाऊस असले तर विशिष्ट वेळात सर्व बँकांचे प्रतिनिधी एकाच ठिकाणी येतील व तिथल्या तिथे प्रत्येक बँकेला आज देणे किती व घेणे किती हे समजणार आहे आणि त्यावर प्रत्येक बँकेला आपल्या तिजोरीत किती पैसे असणार किंवा किती पैसे कमी पडतात हे समजू शकेल. पुढील व्यवहाराला ते सोयीस्कर होणार आहे. म्हणून धनादेश क्लिअरन्स हाऊस येथे स्थापन होणे गरजेचे आहे. स्टेट बँक सोडून इतर दुसºया म्हणजे केवळ एचडीएफसी बँकेतही हे हाऊस स्थापन करता येते मात्र त्यासाठी येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचे त्याबाबत एनओसी (हरकत नसल्याचे पत्र) लागते. अर्थात हे सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत, असेही समजले आहे. मात्र सर्वात अग्रेसर बँक म्हणून एसबीआय बँकेला हे हाऊस असते. एसबीआयच्या विभागीय कार्यालयाने केंद्र सुरू करायचे की नाही ठरवायचे असते. येथील एचडीएफसी बँकेतील शाखा व्यवस्थापकांनी स्टेट बँकेच्या व्यवस्थापनाकडे एनओसी मिळावी यासाठी लेखी मागणी केली असल्याचे समजले आहे. मात्र त्यांना एनओसी पत्र किंवा आम्ही सुरू करतो, असे काहीच दिले जात नसल्याचे समजले आहे.
शहरात सहकारी, नॉन शेड्यूल्ड, शेड्यूल्ड आणि राष्ट्रीयकृत अशा एकूण विविध प्रकारच्या १९ बँकांनी चोपड्यात पदार्पण केले आहे. त्यात स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, देना बँक, सेंट्रल बँक, जिल्हा बँक, धरणगाव अर्बन बँक, जळगाव पीपल बँक शाखा, चोपडा पीपल बँक, क्सिस बँक, शिरपूर पीपल बँक, आयसीआयसीआय बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, हिंगोली पीपल बँक यासह इतर बँकेच्या शाखा सुरू झाल्या आहेत.
आरबीआयची परवानगी लागते. आरबीआयच्या निर्देशानुसार दोनच बँक हे हाऊस सुरू करू शकतात. एक म्हणजे एसबीआय बँक आणि दुसरी बँक एचडीएफसी बँक. मात्र एचडीएफसीला स्टेट बँकेने एनओसी न दिल्याने सध्या प्रत्येक बँकेच्या काऊंटरवरच ही प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक बँकेला यासाठी एक व्यक्ती शहरातील व तालुक्यातील सर्व बँकांमध्ये धनादेश क्लिअरन्ससाठी पाठवावे लागते.
सर्वसाधारणपणे सरासरी एका दिवसात एका बँकेत नोटबंदी आधी केवळ १५ ते २० धनादेश येत होते. नोटबंदीनंतर मात्र धनादेशाद्वारे व्यवहार करणाºया खातेदारांची संख्या एका दिवसाला सरासरी ६० ते ७० च्या वर गेली आहे. एवढी संख्या सर्वच बँकेत असते म्हणून सर्व बँक खातेदारांना जर त्याच दिवशी पैसे वापरता यावेत असे बँकांना वाटत असेल तर क्लिअरन्स हाऊस चोपड्यात असणे गरजेचे आहे. अन्यथा खातेदारांच्या ठेवींवर चालणाºया बँका खातेदारांचे हित कितपत जोपासतात अशी शंका निर्माण होऊ शकते.


आता क्लिअरन्स हाऊस ही संकल्पना जुनी झाली आहे. त्याही पुढील प्रक्रिया म्हणजे धनादेश क्लिअर होण्यासाठी देशभर चार केंद्र सुरू होणार आहेत. धनादेश स्कॅन करून मुंबई येथे पाठविला जाईल आणि त्याच क्षणी संबंधित व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा होतील.
-रामेश्वर कदम, शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, चोपडा

Web Title:  Bank account holders receive money on the third day due to a clearance house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.