शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

केळी कापून फेकली, दोन लाखांचे नुकसान

By admin | Updated: February 11, 2017 00:26 IST

अट्रावलच्या शेतकºयाचे नुकसान : यावल शिवारातील घटनेने शेतकºयांमध्ये संताप, गुन्हा दाखल

अट्रावल, ता.यावल : येथून जवळच असलेल्या यावल शिवारातील    लीलाधर प्रभाकर पाटील यांच्या गट क्र. ८८८ मधील  केळी  बागेचे अज्ञातांनी नुकसान केले. ही घटना सोमवारी रात्री घडली. यात पाटील  यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेने अट्रावलसह परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. लीलाधर प्रभाकर पाटील  यांनी         मागील वर्षी सुमारे पाच हजार केळी खोडांची लागवड केली होती, त्यांनी   केळी पिकाची वर्षभर  जपणूक केली.  योग्य वेळी खतांचे डोस दिले त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात केळी निसवायला सुरुवात झाली. काही खोडे ही कापणी योग्य झाले होते.सुदैवाने यावर्षी केळीला चांगले भाव आहेत. उत्पन्नही चांगले येणार होते.   त्यांनी घेतलेले कर्ज फेडून चार पैसे शिल्लक राहतील, अशी  अपेक्षा पाटील यांची होती. या आशेवर   त्यांचा मुलगा शेतात पीक पाहण्यासाठी जात असे. ८ रोजी सायंकाळी त्यांनी शेतात फेरफटका मारला व रात्री १० वाजता पाटील याचा मुलगा पाणी लावून घरी आला. ९ रोजी सकाळी शेतात गेला  असता  त्यांचे सर्व स्वप्न भंग पावले. कोणीतरी अज्ञाताने लीलाधर पाटील यांच्या शेतातील ५०० निसवलेली केळीची झाड कापून फेकलेले त्यांना आढळले. नुकसान  पाहून   पाटील यांना मोठा  धक्का बसला.   त्यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. वर्षभर केलेली मेहनत वाया गेली.  याबाबत लीलाधर पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्ती विरोधात भादंवि कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.                                 (वार्ताहर)वढोदा येथे शॉर्ट सर्किटमुळे मका जळून खाककुºहा(काकोडा), ता.मुक्ताईनगर - वढोदा शिवारातील शेतात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत १५० क्विंटल मक्याचा ढीग जळून खाक झाला. यात सव्वादोन लाखांचे नुकसान झाले. वढोद्याचे माजी सरपंच संतोष रामभाऊ खोरखेडे यांच्या शेतात सुमारे १५० क्विंटल मक्याचा ढीग  होता. ढिगाच्यावरूनच वीज वितरण कंपनीची मुख्य वीज वाहिनी गेली असून वाहिनीवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या गंजीला आग लागली. आगीत १५० क्विंटल मका जळून खाक झाला. संतोष खोरखेडे यांनी माहिती दिल्यावरून तलाठी जे.एच.चौधरी, वीज कंपनीचे अभियंता राठोड यांनी घटनास्थळी  पंचनामा केला. पोलीस पाटील वसंत वाघमारे उपस्थित होते. मक्याची कापणी केल्यानंतर संबंधीत शेतकºयाने मक्याची गंजी शेतात ठेवली होती. मका तयार करणार त्याआधीच आग लागल्यामुळे शेतकºयाच्या तोंडचा घास हिसकावला गेला आहे. (वार्ताहर)