शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीमुळे केळी गारठली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 23:27 IST

केºहाळेसह रावेर तालुक्यातील स्थिती : निसवण क्षमता मंदावली, मका, हरभºयाला ग्लुकोज

केºहाळे, ता.रावेर : गत काही दिवसांपासून थंडीचा पारा असह्य झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केळीवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला आहे. यामुळे करप्यासह चरक्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे ऐन निसवण्याच्या बहारात असलेली केळीची निसवण क्षमता मंदावली आहे. उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.रब्बीतील हरभरा, मका, गहू या पिकांसाठी थंडी उपायकारक असते. परंतु केळीसाठी अतिथंडी अपायकारक ठरत आहे. थंडीमुळे केळीच्या पानांवर पिवळसरपणा आल्यामुळे चरका आला आहे. यामुळे पाने कोरडी पडण्यास सुरुवात म्हणजेच पाने निर्जीव होत आहेत. याचा परिणाम खोडाच्या वाढीवर प्रत्यक्ष झाला आहे. प्रकाश क्रिया मंदावल्यामुळे पानांच्या पेशीद्वारे मिळणारे ऊर्जास्त्रोत थांबतात व जमिनीतून मिळणारे अन्नद्रव्य घेण्यास मदत होत नाही. यामुळे खोडांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. मृगबहार केळीच्या लागवड केलेल्या बेण्याप्रमाणे  जानेवारी महिन्यात बºयाच शेतकºयांच्या शेतातील केळीची खोडे निसवण्याच्या प्रक्रियेत आहेत. परंतु याच वेळेत थंडीने घात केल्यामुळे केळीची निसवण क्षमता मंदावली आहे. याचा थेट परिणाम केळीच्या घडावर होत आहे. कारण पुरेसे अन्नद्रव्य मिळत नसल्यामुळे घडाची निसवण पूर्णत: होत नाही. परिणामी घड लहान पडत आहेत व सरासरी उत्पन्न घटणार आहे. केळी उत्पादनावर मात करण्यासाठी केळीचे घड निसवण्याची प्रक्रिया तेवढीच महत्त्वाची आहे. केळी लागवड व वाढ झाल्यानंतर खरा भाग निसवण्याचा असतो. निसवण चांगली व दमदार झाल्यास घडाचे वजन, केळीची रुंदी, लांबी मोठी असते, यामुळे उत्पादनाची सरासरी गाठता येते. आधीच काहीशा प्रमाणात असलेल्या करप्यामुळे केळी खोडांच्या खालच्या बाजूची पाने कोरडी पडलेली आहेत. मात्र थंडीच्या वाढीमुळे खोडांच्या वरील पानेसुद्धा पिवळी पडून निर्जीव होत असल्याने करप्याला बळ मिळत असते. त्यामुळे एकंदरीत केळीची वाताहत होते. (वार्ताहर) उत्पन्नावर परिणाम: उपाययोजना हव्यात...४कडाक्याची थंडी आणि करप्याची लागण यामुळे केळीच्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम होण्याची शक्यता जाणकार शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. करप्यावर प्रभावी ठरणारी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याची शेतकºयांची मागणी आहे. रावेर तालुक्यातील केळी बागांवर मोठ्या प्रमाणावर करप्याचे आक्रमण झाले आहे.  अतिप्रमाणात थंडी केळीकरिता अत्यंत नुकसानकारक आहे. यामुळे चरका व करप्याचे प्रमाण जास्त आहे. -प्रवीण महाजन, प्रगत शेतकरी, ऐनपूर