यावल : शहर व परिसरात शनिवारी दुपारी जोरदार वादळी पावसाने हजेरी दिल्याने अनेक ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली़ नुकसानीचा आकडा कळू शकला नाही. शहरासह तालुक्यात साकळी, दहीगाव, मोहराळे, सौखेडा, कोरपावली येथे जोरदार वादळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली़ वादळाने रस्त्यावरची झाडे उन्मळून पडली. त्यामुळे यावल-चोपडा रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी व प्रवाशांनी सहकार्य करीत रस्त्यावरील झाडे उचलून वाहतूक सुरळीत केली. यावल शिवारासह साकळी शिवारातही केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. नुकसानीचा अंदाज मात्र घेता आला नाही. काही गावात विजेच्या तारा तुटल्याने प्रवाह खंडित झाला होता. शहरातही दुपारपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत वीज नव्हती़ वीज कंपनीच्या कर्मचार्यांनी युद्धपातळीवर काम करून सायंकाळी वीज प्रवाह सुरळीत केला़ (वार्ताहर)
वादळी पावसाने केळीचे नुकसान
By admin | Updated: May 18, 2014 01:26 IST