शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
4
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
5
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

केळीच्या आगारात संशोधन केंद्र उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:31 IST

कर्मचाऱ्यांची वाणवा, खते, किटकनाशके यावरही होते संशोधन

जळगाव : १९९१ पासून जळगावातील निमखेडी शिवारात सुरू असलेल्या केळी संशोधन केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रयोगशाळेची मागणी प्रलंबितच असून हे संशोधन केंद्र वर्षानुवर्षे केवळ लागवड व काढणीपर्यंतच्या संशोधनापर्यंतच मर्यादीत राहिले आहे़ या ठिकाणी कर्मचाऱ्यांचीही वाणवा असून केळीच्या आगारातच हे संशोधन केंद्र दुर्लक्षित असल्याने केळी उत्पादकांना दिलासा मिळणार कसा ? हा प्रश्न उपस्थित होत आहे़महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत हे केळी संशोधन केंद्र अनेक वर्षांपासून जिल्ह्यात सुरू आहे़ या ठिकाणी पाच एकरावर केळीसंदर्भातील वाणांवर संशोधन केले जाते़ ९३ वाणांचे या ठिकाणी संकलन करण्यात आले आहे़ यासह खते, किटनाशके यांच्याबाबतीतही संशोधन होते़ यातून शेतकºयांना कसा फायदा होईल, आर्थिक दृष्ट्या शेतकरी कसा मजबूत होईल, याबाबत नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयोग केले जातात. तसेच रोगांवरील उपाय याबाबत प्रयोगद्वारे माहिती संकलीत केली जाते़साठ वर्षांपासून जिल्ह्यातच केंद्रमहात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेले हे केळी संशोधन केंद्र अनेक ठिकाणाहून स्थलांतरीत होऊन सन १९६१ मध्ये सावदा त्यानंतर सन १९६९ मध्ये यावल व सन १९९१ पासून जळगावात स्थित आहे़ राज्यभरातील केळी लागवडीपैकी जळगावातच ६० ते ७० टक्के लागवड होत असल्याने या ठिकाणीच हे केंद्र आहे़अचानक कमी केले कर्मचारी...उद्यान विद्यावेत्ता प्रा़ एऩ बी़ शेख, कनिष्ठ मृदरसायन शास्त्रज्ञ प्रा़ ए़ आऱ मेढे, कनिष्ठ वनस्पती रोग निदान शास्त्रज्ञ यांच्यासह आऱ आऱ डोभाळ, एम़ आऱ देशमुख, व्ही़ एस़ लंगाटे हे कर्मचारी सध्या या संशोधन केंद्रात कार्यरत आहेत़ २०१४च्या आधी या केंद्रात पुरेसे मनुष्यबळ होते मात्र, अचानक एके दिवशी ई-मेल वर पत्र येऊन येथील कर्मचाºयांना अन्य विभागांमध्ये हलविण्यात आले़ तेव्हापासून या ठिकाणी पाच ते सहाच कर्मचारी कार्यरत आहेत़केळीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रक्रियांचे संशोधन या केंद्राद्वारे होते़ कुठलेही संशोधन केल्यावर निष्कर्षापर्यंत पोहचत असताना शेतकºयांना आर्थिक फायदा कसा होईल, याचाच विचार अधिक केला जातो़ आदिवासी शेतकºयांना प्रोत्साहन म्हणून नंदुरबार जिल्ह्यात योजनाही राबविल्या जात आहे़ केळीवर प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे़-प्रा़ एऩ बी़ शेख, उद्यान विद्यावेत्ता.

टॅग्स :Jalgaonजळगाव