शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील बालविश्व गुन्हेगारी विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 11:32 IST

दोन वर्षात १०४ बालगुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

सुनील पाटीलजळगाव : जळगाव शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या गुन्हेगारीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर सर्वाधिक गुन्हेगार हे अल्पवयीन असून खून, खुनाचा प्रयत्न, मुलींचे अपहरण, दंगल, प्राणघातक हल्ला, दरोडा, छेडखानी व बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. २०१७ व २०१८ या दोन वर्षात तब्बल १०४ बालगुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जळगाव शहरात तर वेगवेगळ्या गृपच्या नावाने अल्पवयीन मुलांनी गुन्हेगारी टोळ्या तयार केल्या आहेत. शाळा, महाविद्यालयात या टोळ्यांनी धुडगूस घातला. गेल्या वर्षभरात शिक्षकांवरही हल्लयाच्या घटना घडल्या आहेत. महिला व तरुणींची छेडखानी, फूस लावून पळवून नेणे, दुसऱ्याला मदत करणे यामध्ये देखील अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग निष्पन्न झाला आहे. शरीराविरुध्दच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्यांची संख्या अधिक आहे.२०१७ मध्ये सर्वाधिक गुन्हे२०१७ या वर्षात अल्पवयीन मुलांवर सर्वाधिक ६० गुन्हे दाखल झाले आहेत. दंगल, विनयभंग व बलात्कार या गुन्ह्यांची संख्या अधिक आहे. ज्या गोष्टी पूर्वी शक्य नव्हत्या, त्या आज मोबाईलमुळे सहज शक्य झाल्या आहेत. प्रत्येकाच्या हाती मोबाईल तसेच टी.व्ही. याच्यातील वाईट गोष्टींचेच जास्त अनुकरण केले जात आहे. २०१८ मध्ये ४३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सर्वाधिक गुन्हे चोरीचे आहेत.चोºया व दरोड्यात अट्टलकाही बालगुन्हेगार चोºया, घरफोड्या व दरोड्याच्या गुन्ह्यात अट्टल आहेत. विशेष म्हणजे उच्च घराण्यातीलही मुलांचा यात सहभाग आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर दरोड्यात ८ तर चोरीमध्ये २१ गुन्हेगार असले तरी रेकॉर्डवर न आलेल्या मुलांची संख्या त्याहूनही अधिक आहे. रिमांड होममध्ये अशाच गुन्हेगारांची संख्या अधिक आहे. दरम्यान, कायद्यातील पळवाटांमुळे गुन्हेगारांची संख्या अधिक वाढत चालली आहे. काही नामाकिंत गुन्हेगार हीच संधी साधून गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर करीत आहेत. विशेष म्हणजे शिक्षणाच्य वयातच या मुलांनी गुन्हेगारीचे धडे गिरविले असून व्यसनाच्याही आहारी गेलेले आहेत.बलात्कार, अपहरण अन् छेडखानीपोलिसांच्या रेकॉर्डला असलेल्या गुन्ह्यांची संख्या चक्रावून टाकणारी आहे. बलात्कार, प्रेमप्रकरण, मुलींना पळवून नेणे व छेडखानी यासारख्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचाच सहभाग निष्पन्न झाला आहे. दोन वर्षात ११ अल्पवयीन मुलांवर बलात्कार, छेडखानीचा १४ मुलांवर गुन्हे दाखल आहेत. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातही ४ मुलांचा सहभाग आढळून आला आहे.मोबाईलमुळे अनेक गोष्टी सहज शक्य होऊ लागल्या आहेत. त्याशिवाय आपला मुलगा काय करतो आहे, याकडे पालकांचेही लक्ष नसणे या दोन गोष्टी लहानमुलांना गुन्हेगारीकडे वळण्यात कारणीभूत ठरत आहेत. १६ ते २० या वयोगटातच मुलांना सांभाळणे गरजेचे असून त्यांच्यावर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. अन्यथा हीच मुले पुढे मोठी गुन्हेगार होतात.-केतन ढाके, जिल्हा सरकारी वकीलगुन्हा हा लहान असो की मोठा, शेवटी तो गुन्हाच ठरतो. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे. त्यामुळे कमी वयात मुलगा गुन्हेगारीकडे वळला तर त्याला रोखणे अशक्य असते. त्यासाठी पालकांनीच खबरदारी घेऊन मुलांवर लक्ष केंद्रीत करावे. कायदा आपले काम करीत राहणार. पोलिसांमार्फत नेहमीच शाळा, महाविद्यालयात जनजागृती केली जाते.-डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Jalgaonजळगाव