भाऊसाहेब पठाण जिल्ह्यात
जळगाव : चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनचे राज्य अध्यक्ष मुंबई येथील भाऊसाहेब पठाण हे १५ जानेवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयातील एक दिवसीय मोर्चात सहभागी होणार आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष द. मा. अडकमोल, सरचिटणीस बंडू सोनार, खजिनदार नूर शेख आदींनी केले आहे.
जीएमसीत ओटे तोडले
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात अधिष्ठातांच्या कार्यालय परिसरात भींतीला लागून असलेल्या ओट्यांवर काही लोक बसून आजुबाजुला थूंकत असल्याने हे ओटेच तोडले जात असून या ठिकाणी फुलांची झाडे लावली जाणार आहेत.
धरणगावात ३ रुग्ण
जळगाव : धरणगाव तालुक्यात ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरूवारी या तालुक्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही आणि दोन रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आता सक्रीय रुग्णांची संख्या ३ वर पोहोचली आहे. पाचोरा, भडगात मात्र, तीन रुग्णांची भर पडली आहे.
ओपीडी सुरूच
जळगाव : शुक्रवारी १५ रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान असले तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सकाळी ९ ते १ दरम्यान ओपीडी सुरू राहणार आहे. तसेच नियमीत गर्भवती महिलांचे लसीकरण कक्ष क्रमांक २१० सुरू राहील. असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.