शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी महाराज रथोत्सवात भाविकांची गर्दी

By admin | Updated: April 12, 2017 00:30 IST

यावल : बालाजींच्या जयघोषाने व्यासनगरी दुमदुमली; शहरात रात्रभर रथ भ्रमण सोहळा

यावल : सुमारे १०३ वर्षाची परंपरा असलेल्या  येथील श्री बालाजी महाराज रथोत्सवात मंगळवारी भाविकांची मांदियाळी फुलली होती. श्री महर्षी व्यास मंदिराच्या पायथ्यालगत   नदीपात्रातून    मंगळवारी सायंकाळी  रथोत्सवाला सुरुवात झाली. श्री बालाजी महाराज यांच्या  जयघोषात नागरिकांनी रथ ओढला. सायंकाळी    पावणेसात वाजेच्या सुमारास महाराणा प्रतापनगराजवळ  नदीपात्रात रथयात्रेचे आगमन झाले. श्री बालाजी महाराज यांच्या जयघोषाने अख्खी व्यासनगरी दुमदुमली. सायंकाळी येथील महर्षी व्यास  मंदिराजवळ नदीपात्रात    ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात   महापूजा करण्यात आली.       एक कि.मी. पर्यंत नदीपात्रातून श्री बालाजी महाराज यांच्या  जयघोषात   रथ ओढण्यात आला.  रथमार्गावर महिलांनी   घरांसमोर रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी  रथाची पूजा  केली जात होती. यावलचा रथोत्सव म्हणजे शहरवासीयांसाठी आनंदाची पर्वणीच मानली जाते. रथोत्सवानिमित्त बाहेरगावी असलेली नोकरदार मंडळी,  माहेरवाशीन आल्या आहेत. तहसीलदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे व सहकारी यांनी कायदा सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून चोख बंदोबस्त राखला. शांतता समितीचे सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकाºयांनी सहकार्य केले. उत्सवयात्रा, बारागाड्या आणि रथोत्सवाचा मिलाप... महाराणा प्रतापनगराजवळील नदीपात्रात यानिमित्त यात्रा भरविण्यात आली होती.  खंडोबा महाराज यांच्या बारागाड्या ओढण्यात आल्या. रथोत्सव, यात्रा आणि गाड्या पाहण्यासाठी महिलांसह शहरवासीयांनी मोठी गर्दी  केली होती. यात्रा आटोपल्यानंतर श्री बालाजी रथाचे शहरात आगमन   झाले. बालाजींची रथयात्रा रात्रभर सुरू होती. पहाटेच्या सुमारास भवाणी माता मंदिराजवळ रथोत्सवाची सांगता करण्यात आली.