शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी रथोत्सवात पाचोरेकरांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 21:36 IST

ढोल ताशांच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात गुरुवारी येथील रथोत्सव जल्लोषात साजरा झाला

ठळक मुद्देढोल ताशांचा गजर अन् भाविकांचा उत्साहरस्त्याच्या दुतर्फा काढल्या होत्या रांगोळीयात्रेने फुलले पाचोरा शहर

पाचोरा - ढोल ताशांच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात गुरुवारी येथील रथोत्सव जल्लोषात साजरा झाला तर यात्रेने शहर फुलून गेले.बालाजी महाराजांच्या रथाची मिरवणूक दुपारी तीन वाजता सुरू होऊन उशिरा संपली. बालाजी महाराजांच्या रथाला दोर बांधून लोक समूहाद्वारे रथ गल्ली, विठ्ठल मंदिर रोड तलाठी कार्यालय, जामनेर रोड, महात्मा गांधी रोड या मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली.रस्त्याच्या दुतर्फा सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.मिरवणुकीत शहरातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यानिमित्ताने जामनेर रोड,शिवाजी चौक, गांधी चौक या ठिकाणी मोठी यात्रा भरलेली होती. रथयात्रेत लहान मुलांच्या खेळण्यांपासून विविध हॉटेल्स आणि भांड्यांच्या दुकानासह वेगवेगळे स्टॉल्स असतात तर सोने चांदी, कपडे आणि भांड्यांच्या दुकानातून मोठी आर्थिक उलाढाल होते. पाचोरा तालुक्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामीण भागातून लोकांची मोठी गर्दी होती.रथ थांबवणे, वळवणे यासाठी लाकडी मोगरीचा उपयोग करण्यात आला. मोगरी लावण्याचे काम अशोक वाडेकर व सुभाष सोनवणे व संपूर्ण परिवाराने पार पडले. परशुराम अहिरे आणि त्यांचे सहकारी नितीन शिरसाठ यांनी पारंपारिक पद्धतीने रथासमोर मशाल लावण्याचे काम पहिले. सयाजी पाटील परिवार आणि भक्त यांच्या अथक परिश्रमातून ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह सर्व पोलिस प्रशासनाने चोख प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :PachoraपाचोराJalgaonजळगाव