शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

अनैतिक संबंधात अडसर, आईकडून मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:16 IST

बेपत्ता विद्यार्थी प्रकरण, तिघे ताब्यात

चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील मंगेश दगडू पाटील या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने त्याचा सख्या आईसह दोन जणांनी खून केल्याचे उघड झाले आहे. ‘माता न तू वैरीणी’चा प्रत्यय येणाऱ्या या घटनेप्रकरणी मंगेशची आई गीता पाटील आणि तिचे ज्याच्याशी अनैतिक संबंध होते तो तिचा भाचा समाधान उर्फ संभा विलास पाटील (२५) आणि गल्लीतील रहिवाशी राजेंद्र पंढरीनाथ पाटील (३७) यांना ताब्यात घेतले आहे.या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चहार्डी येथील मंगेश दगडू पाटील (१४) हा २ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याप्रकरणी चोपडा शहर स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मंगेश बेपत्ता झाल्याच्या चौथ्या दिवशी शिवाजीनगर शेजारी तुटलेला पाय आढल्याने या विद्यार्थ्याची नरबळीच्या उद्देशाने हत्या झाल्याची चर्चा सुरू झाली होती. यात श्वान पथकाला पाचारण करून मृतदेह शोधण्याचाही प्रयत्न केला मात्र श्वान पथकाने घटना ठिकाण ते त्याचे घर या दरम्यानच माग काढला होता. परंतु घरातील लोकं त्याचा खून कसा करणार म्हणून त्यावर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. तसेच गावात आलेल्या भिक्षेकऱ्याने अपहरण केल्याच्या वृत्ताला उधाण आल्याने त्याचे छायाचित्रही जारी केले होते. मात्र त्यानंतरही खुनाचा उलगडा होत नव्हता. चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांचे पथक पाठविल्याने अनैतिक संबंधात हा विद्यार्थी अडथळा ठरल्याने त्याचा काटा काढण्यात आल्याची बाब पुढे आली. मयत मंगेश पाटील हा घटनेच्या दिवशी शौचालयाला गेल्यानंतर घरी परतला असता आई गीताबाई पाटील व राजेंद्र पाटील हे आक्षेपार्ह स्थितीत दिसल्याने मंगेशने वाद घातला. त्या वेळी तेथे समाधान पाटीलही पोहचला व तिघांनी मिळून मंगेशचा खून करीत मृतदेह गोणपाटात लपवून टाकला व शौचालयाच्या ठिकाणी मंगेशच्या चपला, रक्ताने माखलेले कपडे टाकून त्याचे अपहरण करून खून झाल्याचा ेबनाव करण्यात आला. आरोपींनी नंतर हा मृतदेह घटनास्थळापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील खादणीत टाकण्यात आल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती प्रशांत बच्छाव यांनी दिली.आरोपी मंगेशची आई गीताबाई पाटील, समाधान उर्फ संभ्या विलास पाटील (२५),राजेंद्र पंढरीनाथ पाटील (३७) यांना २६ रोजी अटक करण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी तथा पोलीस उपविभागीय अधिकारी सौरभकुमार अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. त्यांना चोपडा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश लांडबळे यांनी ५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शर्शनाखाली चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पो. नि. मनोज पवार, चोपडा ग्रामीणच्या फौजदार अर्चना करपुडे, पोलीस नाईक संदेश पाटील, पोहेका शिवाजी बाविस्कर, पोकॉ हितेश बेहरे, सुनील कोळी, पो.ना. संतोष पारधी, विलेश सोनवणे, संगीता पवार यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.आता खदानीत मृतदेहाचा शोध सुरूचोपडा पोलिसांनी या प्रकरणात संशयीत म्हणून गीताबाई, राजेंद्र पाटील व समाधान पाटील यांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी संशयीतांनी मृतदेह ज्या खदानीत टाकला तेथे मयत मंगेशच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे काम दुपारी चार वाजता सुरू झाले. त्यासाठी नाशिक येथील विशेष पथक दाखल झाले आहे. तसेच विद्यार्थ्याचे घर असलेल्या शिवाजी नगर भागात संरक्षणासाठी मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव