शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील बाफना ज्वेलर्सच्या ८० संगणकातील डेटा हॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:38 IST

हॅकरकडून ६५ लाखाची खंडणीची मागणी

जळगाव : प्रति सॉफ्टवेअर ९८० डॉलर या प्रमाणे खंडणी न दिल्याने हॅकरने जळगावच्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्समधील ८० संगणकांतील साफ्टवेअरचा डेटा हॅक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ८० सॉफ्टवेअरची किंमत भारतीय चलनानुसार ६५ लाख रुपये आहे. दरम्यान, या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. डेटा हॅक केला असला तरी आमची सर्व माहिती सुरक्षित असल्याचा दावा ज्वेलर्सचे संचालक सिध्दार्थ बाफना यांनी केला आहे.याबाबत गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. बाफना ज्वेलर्समध्ये दैनंदिन व्यवहारासाठी बिलींग सॉफ्टवेअर, कस्टमर डिटेल्स, ट्रान्झॅक्शन डिटेल्स व टेली इआरपी (अकाउंट विभाग) हे चार विभाग आहेत.२४ नोव्हेंबर रोजी या चारही विभागातील ८० संगणकातील डेटा हॅक झाल्याचे व इनस्क्रीप्ट झाल्याचे लक्षात आले. इनस्क्रीप्ट झालेल्या एका फोल्डरमध्ये प्रति सॉफ्टवेअर ९८० डॉलर प्रमाणे खंडणी मागणीची एक नोट पॅड फाईल होती. त्यात तुमचा डेटा हॅक करण्यात आल्याचे सांगून हा डेटा परत मिळवून देवू शकतो त्यासाठी तुम्ही आमच्या संपर्क साधा असे सांगून ईमेल आयडीसुध्दा त्यांनी पाठविला होता. त्यावर कोणतीही एक फाईल पाठवा, ती फाईल विनाशुल्क क्लीअर करुन देवून. आम्हीच डेटा हॅक झाल्याची खात्री पटल्यानंतर ९८० डॉलरची पाठवा असे म्हटले होते.त्यामुळे हा डेटा चोरी झाल्याचा संशय आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिध्दार्थ बाफना व जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधून झाल्याप्रकाराची माहिती व काही पुरावे सादर केले.बॅकअपमुळे माहिती सुरक्षितसिध्दार्थ बाफना यांनी सांगितले की, हॅकरने डेटा हॅक केला असला तरी संगणकातील बॅकअप आमच्याकडे असल्याने माहिती सुरक्षित आहे, मात्र चोरी व खंडणीचा प्रकार असल्यानेच पोलिसांकडे तक्रार केली. डेटा कोठून व कोणी हॅक केला हे स्पष्ट झालेले नाही. ९८० डॉलरप्रमाणे ६५ लाख रुपये दिले नाहीत तर भविष्यातही डेटा हॅक करण्याची धमकी हॅकरने दिली असल्याचे बाफना यांनी सांगितले. डेटा हॅकमुळे किंचीतशी माहिती गेली आहे, मात्र बॅकअपमध्ये सुरक्षित असल्याने त्याची नोंदणी आम्हाला पुन्हा करावी लागणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव