शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:27 IST

जळगाव मतदार संघात १११ तर रावेर मतदारसंघात ८५ अवैध दारुचे गुन्हे दाखल

जळगाव : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यासह अवैध दारु विक्री, आचारसंहिता भंग, रोख रक्कम जप्तच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत १११ जणांविरुद्ध तर रावेर मतदार संघात ८५ जणांविरुद्ध अवैध दारु विक्री प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. यासोबतच आचारसंहिता भंगाच्या ९ तक्रारी करण्यात आलेल्या असून त्यापैकी दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. तर दोन्ही मतदारसंघात आतापर्यंत पथकाने २० लाख दोन हजार ५०० रुपयांची रक्कम जप्त केली आहे. एकूणच स्थिती पाहता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारुला मागणी वाढत झिंगही वाढू लागली आहे.‘हातभट्टी’ जोरातनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव व रावेर मतदारसंघात केलेल्या कारवाईत सर्वाधिक हातभट्टीची दारु हाती लागली आहे. दोन्ही मतदार संघात मिळून ३ हजार ३० लीटर हातभट्टीची दारु कारवाईदरम्यान आढळून आली. उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा प्रशासनास दिलेल्या आकडेवारीनुसार जळगाव मतदार संघात एकूण १११ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या ३८ जणांना अटक करण्यात आले आहे. या मतदार संघात दोन हजार १६० लीटर हातभट्टीची दारु आढळून आली तर ६२ हजार ४२० लीटर रसायन पथकाने नष्ट केले. या सोबतच ८२.८८ लीटर देशी दारु, ५.४ लीटर विदेशी, ३० लीटर बिअर व इतर असे एकूण ५०५ लीटर मद्य व साहित्य कारवाई दरम्यान पथकाने जप्त केले आहे.रावेर मतदारसंघात ‘विदेशी’ अधिकरावेर मतदार एकूण ८५ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या २३ जणांना अटक करण्यात आलीआहे. या मतदारसंघात ८७० लीटर हातभट्टीची दारु आढळून आली तर २९ हजार ८१६ लीटर रसायन पथकाने नष्ट केले. या सोबतच २६.०४ लीटर देशी दारु, ५३.४१ लीटर विदेशी, २५ लीटर बिअर पथकाने जप्त केली आहे.वाहने जप्तअवैध दारु विरुद्ध कारवाई करताना जळगाव लोकसभा मतदारसंघात ५ लाख ५५ हजार रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली असून १४ लाख ७६ हजार ३८६ रुपये किंमतीचे इतर साहित्य जप्त केले. वाहने व इतर साहित्य मिळून २० लाख ३२ हजार ५८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशाच प्रकारे रावेर मतदार संघात ३ लाख रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली असून ७ लाख ७४ हजार २०६ रुपये किंमतीचे इतर साहित्य जप्त केले. वाहने व इतर साहित्य मिळून एकूण १० लाख ७४ हजार २०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हेजळगाव लोकसभा मतदारसंघात चार आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहे तर रावेर मतदारसंघात पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये रावेर मतदारसंघात विनापरवानगी भाजपचा प्रचार करण्यासाठी वाहन वापरल्याप्रकरणी मलकापूर येथे एक गुन्हा दाखल झाला. या सोबतच रावेर मतदारसंघातच भुसावळ येथे उमेदवार निवडून आल्यास मतदारास ५०० रुपये दिले जातील असे आमीष दाखविल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त इतर तक्रारींचे त्या-त्या पातळीवर निवारण करण्यात आले आहे तर वरिष्ठ स्तरावरील तक्रारी त्या-त्या ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत.पाच ठिकाणी रक्कम जप्तनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या पथकांनी केलेल्या तपासणीदरम्यान पाच ठिकाणी २० लाख २ हजार ५०० रुपये जप्त केले आहे. यामध्ये मलकापूर येथे १ एप्रिल रोजी ४ लाख ७० हजार रुपये जप्त केले. २ रोजी पाचोरा येथे ५ लाख ४५ हजार रुपये, ५ रोजी जळगाव ग्रामीण भागात ३ लाख ५० हजार, ६ रोजी भुसावळ येथे ४ लाख ४० हजार रुपये आणि ८ रोजी पुन्हा भुसावळ येथे एक लाख ९७ हजार ५०० रुपये पथकाने जप्त केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव