शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सद्यस्थितीतही आयुर्वेद प्रभावी - वैद्य पी.एस.चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:38 IST

संशोधन केलेल्या २०० वैद्यांचा गौरव

जळगाव : विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन शोध प्रक्रियेतून आयुर्वेदाचेही स्वरुप अधिकाअधिक प्रभावीपणे जनमानसात स्थान निर्माण करीत असल्याचे मत प्रसिध्द वैद्य पी. एस. चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. या भारतीय चिकित्सा पध्दतीने प्राचीन काळापासून आपल्या वैशिष्टयाने आपले श्रेष्ठत्व आजही टिकवून ठेवल्याचे ते म्हणाले.गेल्या अनेक वर्षांपासून धन्वंतरी जयंती उत्सव साजरे करणारे वैद्य पी.एस.चौधरी यांची धन्वंतरी जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने भेट घेतली असता, त्यांनी धन्वंतरी जयंती, तसेच त्यामागील भूमिका व कार्य यावर चर्चा केली.४४ वर्षांपूर्वी चौधरी यांनी जोशी पेठेतील बागवान गल्लीत स्वत:च्या दवाखान्यात धन्वतरी जयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात या उत्सवाकडे कोणीच फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे या उत्सवास येणाऱ्यांची संख्या ८ ते १० इतकीच होती, मात्र हळूहळू ही संख्या वाढत गेली. आता ही संख्या २५० च्यावर पोहचली आहे. स्व.वैद्य भालचंद्र शंकर जहागीरदार, स्व.वैद्य मोतीराम तळेले, वैद्य निंबाळकर व वैद्य वर्डीकर अशी नामाकिंत वैद्य मंडळी तेव्हा होती.आयुर्वेदाचा प्रसार करण्याचा प्रयत्नजनसामान्यांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार व्हावा, दैनंदिन जीवनात सर्वसाधारण लोकांना आरोग्याचे महत्व कळावे या उद्देशानेच धन्वंतरी जयंती उत्सव साजरा केला जात असल्याचे वैद्य चौधरी म्हणाले. यासाठी दरवर्षी विद्वान वैद्यांना बोलावून विविध विषयावर व्याख्यानही घेतले जाते.वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करणाºयांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी अशा व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. सी.व्ही.त्रिपाठी यांच्या मदतीने अखंडपणे हा उत्सव साजरा करीत असताना जयंत जहागीरदार व नरेंद्र गुजराथी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे चौधरी म्हणाले.उत्कृष्ट कामगिरीमुळे गौरवभारत सरकारने नुकताच धन्वंतरी दिन हा राष्टÑीय आयुर्वेद दिन म्हणून घोषीत केला आहे. त्यामुळे देशातील आयुर्वेद परंपरेला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. सर्व भारतीयांनी आयुर्वेद चिकित्सा पध्दतीचा आपले स्वास्थ व्रत समजून स्विकार केला पाहिजे, असेही मत चौधरी यांनी व्यक्त केले. दरम्यान, आयुर्वेदातील आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामागिरीमुळे पी.एस.चौधरी यांना पुणे येथे खडीवाले वैद्य यांच्याहस्ते ‘वैद्य शंकरदाजी पजे शास्त्री कार्यकर्ता’ या पुरस्काराने १९९१ मध्ये तर धुळे येथे २०१६ मध्ये गौरविण्यात आले आहे.

टॅग्स :interviewमुलाखतJalgaonजळगाव