शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाविषयी आता विद्यार्थ्यांमध्येही जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 15:13 IST

सुखद : इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात यंदा केलाय धड्याचा समावेश

चाळीसगाव, जि.जळगाव : अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी राज्य पातळीवर अभियानाद्वारे जनजागृती करण्यात येत होती. परंतु आता राज्य शासनाच्या इयत्ता दहावीच्या विज्ञान भाग २ च्या पुस्तकाच्या पान क्रमांक ९० वर अवयवदान तसेच देहदान यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. अवयव दानाचे महत्त्व शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांना कळावे यासाठी दहावीच्या अभ्यासक्रमात अवयवदानाचा धडा समाविष्ट करण्यात आला असून, देहदानाचीदेखील माहिती यात देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती होण्यास मदत होईल.यंदाच्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांपासून दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नव्या अभ्यासक्रमात शब्द संपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वयंअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण क्षमता, निर्णय क्षमता, जबाबदार नागरिकत्वाचे भान, उद्योग- व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर देण्यात आला आहे.विज्ञानाच्या पुस्तकातून अवयव दानाचे महत्त्व आणि अवयव दान कशा पद्धतीने करता येते याची माहिती या धड्याच्या माध्यमातून मिळणार आहे. देशात अवयवदानाचे महत्त्व आणि माहिती घराघरात पोहोचावी, अवयवदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी राज्य शासनाने अवयवदान, देहदान, आणि अवयव प्रत्यारोपण विषयाची माहिती देणारा पाठ समाविष्ट केला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शाळेपासूनच मुलांना अवयवदानाची माहिती मिळणे शक्य होणार आहे.काय आहे नेमके धड्यात?अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय?अवयव प्रत्यारोपण करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?कोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करणे शक्य आहे?लोकांचा जीव वाचविण्यासाठी अवयवदान का महत्त्वाचे आहे?देहदान म्हणजे काय? याचा वापर संशोधनासाठी कसा केला जातो?अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून कोणते प्रयत्न केले जात आहेत?देहदान आणि अवयवदानाबाबत आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. अवयवदानाबाबत राज्य शासन जनजागृती मोहीम हाती घेत असली तरी याबाबत लोकसहभाग वाढणेही आवश्यक आहे. तसेच अवयवदानाची माहिती शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे.- किशोर शिरोडे, शिक्षक, आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कूल, चाळीसगाव, जि.जळगाव

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव