शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार
2
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: PSI परीक्षेचा निकाल जाहीर, कोणी पटकावला प्रथम क्रमांक?
3
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
4
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
5
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
6
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
7
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
8
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
9
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
10
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
11
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
12
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
13
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

दिव्यांगांसाठी झटणाऱ्या मीनाक्षी निकम यांना ‘वसुंधरा रत्न’ पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:12 PM

मीनाक्षी निकम यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र सोबत १० हजार रुपये, शाल, श्रीफळ देवून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देमला मिळालेला पुरस्कार हा चाळीसगावकरांचाच सन्मान -मीनाक्षी निकम स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र सोबत १० हजार रुपये, शाल देवून पुरस्कार प्रदान
चाळीसगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'वसुंधरा' फाऊंडेशनतर्फे 'वसुंधरा रत्न' २०२१ पुरस्काराचे वितरण शिवजयंतीदिनी करण्यात आले होते. यंदाचा २०२१ हा पुरस्कार दिव्यांग बंधू-भगिनी तसेच घटस्फोटीत, विधवा गरीब महिला यांच्या सबलीकरणासाठी लढा देणाऱ्या व खास महिलांसाठी सामाजिक कार्याची ज्योत लावली अशा दिव्यांग भगिनी मीनाक्षी निकम यांना अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.महेश पाटील, योगाचार्य बाबासाहेब चंद्रात्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रारंभी माता जिजाऊ, शिवरायांच्या प्रतिमेचे मान्यवरांनू पूजन केले. कार्यक्रमाला आमदार मंगेश चव्हाण, निवृत्त ब्रिगेडियर नातू, सर्पमित्र राजेश ठोंबरे, उमंग सृष्टी परिवाराच्या संस्थापिका संपदा उन्मेश पाटील, वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष धरती सचिन पवार, जिजाऊ उत्सव समितीच्या सोनल साळुंखे, नगरसेविका सविता राजपूत, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना मनोगतात मीनाक्षी निकम यांनी सांगितले की, चाळीसगावच्या मातीतील जनमाणसांनी मला पुरस्कार देऊन माझी अधिक जबाबदारी वाढवली आहे. चाळीसगाववासीयांनी दिलेला पुरस्कार हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला नेहमीच प्रोत्साहन देणारा राहील. तसेच हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून, हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण चाळीसगावकरांचा असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र सोबत १० हजार रुपये, शाल, श्रीफळ देवून पुरस्कार प्रदान करण्यात आला.मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, मंदार पाठक, योगेश राजधर पाटील, प्रमोद चव्हाण, सचिन दायमा, सुरेश शेटे , रोटरीचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी, कवी रमेश पोद्दार, पप्पू राजपूत, बबडी शेख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसुंधरा फाऊंडेशनचे सुनील भामरे, रविराज परदेशी, सचिन मोरे, अजय जोशी, धर्मराज खैरनार, मनोज पाटील, मनीष मगर, मुकेश गोसावी, सोनू अहिरे, भोजराज खैरे, सचिन पवार यांनी परिश्रम घेतले.
टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव