शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ रेल्वे स्थानकावरील स्वयंचलीत जिने जूनअखेर कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 18:38 IST

देशभरातील संपूर्ण दिशांकडून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचे स्थानक असलेल्या भुसावळ येथील रेल्वे स्थानक हायटेक करण्याला गती मिळाली असून स्वयंचलीत जिन्यांचे काम पूर्ण होऊन ते जूनअखेर खुले होणार आहेत. तसेच रेल्वे प्रवासी गाड्यांची संख्या वाढल्याने दोन फलाटांची उभारणी सुरू असून ते आॅगस्टपर्यंत पूर्ण होणार आहेत.

ठळक मुद्देभुसावळ रेल्वे स्थानक बनतेय हायटेकनवीन फलाटही आॅगस्टमध्ये प्रवाशांसाठी खुले होणार देशभरातून दररोज ११० गाड्यांचे होते आवागमन

लोकमत आॅनलाईनभुसावळ, दि.१० : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे प्रशासनाने स्थानक हायटेक करण्यासाठी तसेच स्थानकावर प्रवाशांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देता याव्या या उद्देशातून स्वयंचलीत जिने उभारणीचे काम सुरू केले असून जून अखेरपर्यंत हे जिने प्रवाशांना वापरासाठी खुले करण्यात येणार आहेत. तर नविन फलाट क्रमांक ९ व १० यांच्या उभारणीचे काम देखील युद्धपातळीवर सुरू असून आॅगस्टपर्यंत प्रवाशी गाड्या या फलाटांवर लागतील अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली.मध्य रेल्वेच्या अत्यंत महत्वाच्या अशा भुसावळ स्थानकावर फलाट क्रमांक एकला लागून दोन नवीन फलाटांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तिसरा व चौथा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर हे फलाट या मार्गाला जोडले जातील . फलाट ९ आणि १० सहाशे मीटर लांबीचे राहतील तर रुंदी १५ मीटर इतकी राहील. फलाटांच्या उभारणीसाठी ५० ते ६० कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे.संपूर्ण देशभरातून भुसावळ रेल्वेस्थानकावर ११० पेक्षाही जास्त प्रवासी गाड्या दररोज ये- जा करतात. दोन नवीन फलाट उभारणीनंतर प्रवाशांची गर्दी कमी होण्यासाठी ते सोयीचे ठरणार आहे . शिवाय प्रवासी गाड्यांच्या संख्येतही यामुळे वाढ होणार आहे. त्यामुळे फलाटांचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या आॅगस्टपर्यंत ते दोन्ही प्रवाशांसाठी वापरात येणार आहेत.स्वयंचलित जिने महिनाअखेर सुरूभुसावळ रेल्वे स्थानकासाठी अनेक वर्षापासून मागणी असलेले स्वयंचलित जिन्यांचे काम युद्धस्तरावर सुरू असून या महिन्याच्या अखेरपर्यंत ते देखील प्रवाशांसाठी खुले होणार आहे. यामुळे वयोवृद्ध, महिलांसाठी मोठी सोय होणार आहे. डाऊन स्वयंचलित जिनेही प्रस्तावीतसध्या रेल्वे स्थानकावर जाण्या- येण्यासाठी स्वयंचलित जिन्याचे काम सुरु आहे. ते कार्यान्वित झाल्यानंतर उतरण्यासाठीही (डाऊन) स्वयंचलित जिने प्रस्तावधिन असून त्यांचेही कार्य लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आर. के. यादव यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :railwayरेल्वे