शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

जळगाव जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी दम दाखवावा-खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 22:41 IST

वरणगाव येथे मंजूर असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नगर जिल्ह्यात होणारे स्थलांतर थांबवून दाखवावे, असे आव्हान भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले आहे.

ठळक मुद्देवरणगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राचे स्थलांतर रोखण्याचे आव्हानराज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी

मुक्ताईनगर, जि.जळगाव : नाथाभाऊंचा प्रशासनाला धाक आणि सरकारवर वचक होता म्हणून जिल्ह्यात अनेक कामे आणलीत. आता जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये दम असेल तर त्यांनी वरणगाव येथे मंजूर असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नगर जिल्ह्यात होणारे स्थलांतर थांबवून दाखवावे, असे आव्हान भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले आहे. याचबरोबर सत्ताधारी पक्षांनी निदान जिल्ह्यात आम्ही आणलेली कामे तरी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यात हलविण्याबाबत राज्य शासनाच्या निर्णयावर केले आहे.याबाबत खडसे यांनी सांगितले, १९९९ साली वरणगाव आॅर्डनन्स फॅक्टरी लगत पोलीस प्रशिक्षण केंद्र मी मंजूर करवून घेतले होते. यासाठी १०६ एकर जमीन शासनाकडून मंजूर करवून घेतली होती, तर नियोजित पोलीस प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजनही पार पडले होते. आर्र्थिक तरतूदही केली होती. मधल्या काळात हे प्रशिक्षण केंद्र हलविण्याच्या हालचाली असताना मी आक्रमक भूमिका घेत हा प्रकल्प येथून हलवू नका, अशी मागणी केली होती. परिणामी पुन्हा या प्रकल्पाबाबत आशावाद निर्माण झाला होता.अनेक प्रकल्प हलविण्याचा घाटआता अलीकडे आपण राजकीय दृष्ट्या प्रशासन आणि शासन यापासून लांब असल्याने सरकारला फावले आहे. केवळ वरणगाव पोलीस प्रशिक्षणच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हलविण्याचे घाट सुरू आहेत, असा आरोपही खडसे यांनी केला.सत्ताधारी पक्षातील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमध्ये दम असेल तर त्यांनी आता ताकद लावावी आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र हलविण्यात येण्याची कार्यवाही थांबवून दाखवावी व हे प्रशिक्षण केंद्र आकारास आणून दाखवावे, असे आव्हान त्यानी दिले आहे. निदान आम्ही जिल्ह्यात आणलेले प्रकल्प इतरत्र वळू नये याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाने घेतली पाहिजे. जेणेकरून जिल्ह्याचे नुकसान होणार नाही, असेही खडसे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर