| ||
■ सद्य:स्थितीत नंदुरबार शहरात सहा पोलीस चौक्या आहेत. त्यात हाटदरवाजा, जळकाबाजार, मंगळबाजार, पत्रा चौकी या जुन्या तर फडके चौकी, कोरीटनाका चौकी या नवीन उभारण्यात आल्या आहेत. याशिवाय सात ठिकाणी फिक्स पॉइंट कायम ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस चौकीवर हवालदार दर्जाच्या कर्मचार्यांची नेमणूक आहे. नवीन पोलीस ठाणे निर्माण झाल्यानंतर त्या अंतर्गतदेखील पाच पोलीस चौकी करण्याचे नियोजन राहणार आहे. त्यामुळे शहरात पोलीस चौकींची संख्या बारापर्यंत जाणार आहे. शिवाय फिक्स पॉइंट वेगळे राहणार आहेत. परिणामी नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नवीन पोलीस चौकींचे स्थानदेखील निश्चित करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे. नंदुरबार :नंदुरबारकरांना आता नवीन पोलीस ठाण्याची प्रतीक्षा लागून आहे. शासनाने दोन महिन्यांपूर्वी नवीन पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. त्यासाठीच्या अधिकारी व कर्मचार्यांच्या पदांनाही मंजुरी मिळालेली आहे. आचारसंहिता संपताच नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीला गती येणार आहे. यामुळे नवीन वसाहतींच्या भागांना बर्यापैकी सोय होणार आहे. नंदुरबार शहराचा विस्तार आणि होणार्या कायदा व सुव्यवस्थेच्या घटना लक्षात घेता नवीन पोलीस ठाणे निर्माण करावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.संजय अपरांती यांनी प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविला होता. त्यानुसार नंदुरबार उपनगर या पोलीस ठाण्याला मान्यता देण्यात आली आहे. राज्यात एकाच वेळी ६३नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती होणार असून त्यात नंदुरबारचा समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था नंदुरबार हे दंगलीचे शहर, अशी कुप्रसिद्धी मिळाली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात नंदुरबारात मोठय़ा प्रमाणावर सामाजिक एकोपा दिसून आला. राज्यात, देशात काही घटना घडल्या. तरी त्याचे पडसाद नंदुरबारात उमटले नाही किंबहुना अशा घटना घडू नयेत यासाठी दोन्ही समाजाच्या लोकांनी एकोप्याने परिस्थितीचा सामना केला. तरीही नंदुरबारचे गेल्या काही वर्षातील क्राईम रेकॉर्ड पाहता आणि वाढता विस्तार लक्षात घेता नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याकडे शासनाचाही कल राहिला. त्या आनुषंगानेच नवीन 'नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्या'ची निर्मिती करण्यात आली आहे. कार्यकक्षा उड्डाणपुलाच्या अलीकडील व पलीकडील भाग अशा दोन भागात दोन्ही पोलीस ठाणे विस्तारले जाणार आहेत. त्यासाठीची कार्यकक्षा निश्चित करण्याचे कामदेखील संब्ींधित विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. येत्या अडीच महिन्यात अर्थात १५ ऑगस्टला नवीन पोलीस ठाणे कार्यरत करावे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. नवीन पोलीस ठाण्याची कार्यकक्षा ही धुळे रोड, साक्री रोड, नवापूर रोड परिसरातील नवीन वसाहती, शासकीय कार्यालये आणि जुन्या शहरातील काही भाग असा राहणार असल्याचे समजते. विस्तार आणि कार्यकक्षा ठरविण्यासाठी गेल्या काही वर्षातील क्राईम रेकॉर्डचादेखील आधार घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस कर्मचारी जुन्या व नवीन पोलीस ठाण्याची अधिकारी व कर्मचार्यांची संख्या मिळून तब्बल अडीचशेपर्यंत जाणार आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि विशेषत: नवीन वसाहतीतील भुरट्या चोर्या आणि इतर क्राईम रोखण्यास मदत होणार आहे. नवीन पोलीस ठाण्यात अंदाजे ९0अधिकारी व कर्मचारी राहण्याची शक्यता आहे. त्यात दोन पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक, चार उपनिरीक्षक, १२ जमादार, २१ हवालदार, २१पोलीस नाईक व २७शिपाई राहण्याची शक्यता आहे. सध्या शहर पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचार्यांची संख्या मिळून १४२पर्यंत आहे. |
१५ ऑगस्टचा मुहूर्त
By admin | Updated: May 12, 2014 19:03 IST