शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कराची रक्कम थकल्याने श्री विंध्या पेपर मिलचा लिलावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:58 IST

जळगाव : कराची रक्कम थकविल्याने दुसखेडा, ता.यावल येथील श्री विंध्या पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेडच्या ८८ हजार ५८४ चौरस मीटर ...

जळगाव : कराची रक्कम थकविल्याने दुसखेडा, ता.यावल येथील श्री विंध्या पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेडच्या ८८ हजार ५८४ चौरस मीटर जागा ‘जीएसटी’ (वस्तू व सेवा कर) विभागाने लिलावात काढली आहे.या बाबत जीएसटी विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, श्री विंध्या पेपर मिल प्रायव्हेट लिमीटेडकडे विक्रीकर विभागाकडे २००१-०२पासून मूल्य वर्धीत कर (व्हॅट) व मुंबई विक्री कराची (बीएसटी) ३ कोटी ४० लाख ५१ हजार ४५० रुपयांची थकबाकी आहे. अनेक वेळा कंपनीचे संचालक शेखर सोमाणी, नंदकुमार सोमाणी, राजकमल मिश्रा यांना याप्रकरणी नोटीस देवून थकबाकी भरण्यास सांगितले. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे जीएसटी विभागाने मिलच्या ८८ हजार ५८४ चौरस मीटर जागेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती राज्य कर अधिकारी एन.के.नेरकर यांनी दिली.श्री विंध्या पेपर मिल कंपनीकडे जीएसटी विभागाची कराची बाकी ३ कोटी ४० लाख ५१ हजार ४५० रुपयांची थकबाकी तर त्यावर ४ कोटी ६४ लाख ९० हजार व्याज असे एकूण ८ कोटी ६ लाख ४२ हजार ३७८ रुपयांची बाकी आहे. त्याची वसुली या लिलावातून करण्यात येणार आहे. २१ मे रोजी मिलच्या जागेचा लिलाव होता, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा सर्व प्रक्रिया करून पुन्हा लिलाव करण्यात येणार असल्याचे नेरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव