शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

ं निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 01:18 IST

अमळनेर/ पारोळा/ चोपडा : दुपारी दोनपर्यंत निकाल हाती येणार

अमळनेर/पारोळा/चोपडा : गेल्या  आठवड्यात झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होत आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी होती. १६ रोजी मतदान झाल्यानंतर सर्वच उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले होते. सर्वच पक्षांनी विजयाचा दावा केलेला असला तरी मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला आहे, याचा फैसला आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.अमळनेरजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक  मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. निवडणूक निरीक्षक विशेष लक्ष ठेवून असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.निवडणूक निरीक्षक दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत आज मतमोजणीची रंगीत तालीम घेण्यात आली. सुमारे १०० कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. इंदिरा भुवनमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी केली जाईल. १६ टेबलांवर मतमोजणी होईल. आठ टेबलांवर एकाचवेळी चार जि.प.गटाची तर उर्वरित आठ टेबलांवर पंचायत समिती गणांची मतमोजणी होईल. २७ फेºयांमध्ये मतमोजणी होईल. सुसूत्रतेसाठी मतदान यंत्र (ईव्हीएम मशीन) ने-आण करण्यासाठी जि.प., पं.स.साठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांना वेगवेगळ्या रंगांचे टी-शर्ट देण्यात आले आहेत. प्रत्येक फेरीनुसार निकालाची आकडेवारी, आॅनलाइन निवडणूक आयोगाला कळवण्यात येणार आहे.१०० कर्मचारी नियुक्तनिवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, ८ पोलीस अधिकारी, ६१ पोलीस कर्मचारी, २३ होमगार्ड नियुक्त केले आहेत. जि.प.साठी दोन मतमोजणी प्रतिनिधी  तर पं.स.साठी एक प्रतिनिधी प्रत्येक उमेदवाराला देता येणार आहे.पारोळायेथे मतमोजणी नवीन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. सकाळी ९.३० वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. मतमोजणीसाठी १६ टेबल लावण्यात येतील. यात जि.प. व पं.स.साठी प्रत्येकी आठ-आठ टेबल असतील. मतमोजणीसाठी ७० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. चार नायब तहसीलदार, १० मंडळ अधिकारी, २४ तलाठी आदींचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होणार आहे.चोपडा येथे मतमोजणी  महाराष्ट्र शासनाच्या वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.  तहसीलदार दीपक गिरासे यांनी  सांगितले की, जिल्हा परिषदेच्या सहा गटासाठी बारा टेबलांची मांडणी केली आहे. प्रत्येक गणासाठी एक टेबल या प्रमाणे बारा टेबल अशी २४ टेबलची मांडणी केली आहे. एकाच गट आणि गणांची मतमोजणी होणार असल्याने केवळ दोन तासात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी अधिकारी ते शिपाई असे शंभर कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. मतमोजणीच्या वेळी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र भारदे यांनी दिली. त्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी बिरबल वळवी, तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, डॉ. स्वप्निल सोनवणे, महेश साळुंखे आदी परिश्रम घेत आहेत.मतमोजणीच्या सुरुवातीला टपाली मतदान मोजले जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होईल. यंदापासून आॅनलाइनच विजयाचे प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. नियंत्रणासाठी अतिशीघ्र दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.४गुरुवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी होणार असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे लक्ष निकालाकडे लागून आहे. कोण विजयी होणार, ते निकालानंतरच स्पष्ट होईल.