आॅनलाईन लोकमतअमळनेर,दि.१४ : दहा वर्षीय शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे मुलीच्या संतप्त नातेवाईकानी आणि उपस्थितांनी त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल नाही. बुधवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली.येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालय भागात जनरल किराणाच्या मालकाने मंगळवारी सायंकाळी वस्तू घ्यायला आलेल्या १० वर्षीय शाळकरी मुलीस दुकानात घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित मुलीने झालेला प्रकार पालकांना सांगितला. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्या दुकानदारास बेदम चोप दिला. त्यामुळे घटनास्थळी मोठा जमाव जमला. नातेवाईकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
अमळनेर येथे शाळकरी मुलीवर अतिप्रसंगचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 15:56 IST
दहा वर्षीय शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे मुलीच्या संतप्त नातेवाईकानी आणि उपस्थितांनी त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
अमळनेर येथे शाळकरी मुलीवर अतिप्रसंगचा प्रयत्न
ठळक मुद्देदहा वर्षीय शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नपीडित बालिकेने हा प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर दुकानमालकाला मारहाणसंशयिताला दिले पोलिसांच्या ताब्यात