शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

भुसावळात एटीएम फोडून रक्कम लांबविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:42 IST

भुसावळ , जि.जळगाव : शहरातील जामनेर रोडवरील नवशक्ती कॉम्प्लेक्समधील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला. ही घटना ...

ठळक मुद्देचोरटे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैदचोरट्यांनी चेहºयाला गुंडाळले होते कापड

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील जामनेर रोडवरील नवशक्ती कॉम्प्लेक्समधील इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला. ही घटना शनिवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली.घटनेचे वृत्त समजताच पोलीस अधिकाठयांनी धाव घेतली. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात इंडीयन ओव्हरसीस बँकेचे शाखाधिकारी आशिषकुमार सोनडीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात ठिकठिकाणी घरफोडीचे सत्र सुरू आहे. यातच आता चोरट्यांनी एटीएम मशीनकडे लक्ष वळविल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली.शहरातील जामनेर रोडवरील मोटूमल सोबराज चौकाजवळ इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरटङांनी १५ रोजी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान फोडण्याचा प्रयत्न केला. सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास नवशक्ती कॉम्प्लेक्समधील दुकानदार नितीन वायकोळे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी संबंधितांना याबाबत कळविले. अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनचे मेन गेटचे लॉक तोडून आत प्रवेश केला. मात्र, चोरट्यांकडून एटीएम मशीन न तुटल्याने त्यांनी पोबारा केला. एटीएम मशीनमध्ये अंदाजे ८ लाख रुपयांची रक्कम होती. १४ रोजी दुपारी १ वाजता उपशाखा अधिकारी यांनी एटीएम मशीन चेक केले होते. १३ रोजी त्यांनी एटीएममध्ये रक्कम नसल्यामुळे ८ लाख ७३ हजार ३०० रुपयांचा भरणा केला होता. दोन दिवसात ग्राहकांनी १८ हजार ८०० रुपये काढले. उर्वरीत रक्कम चोरण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. एटीएम मशीनवर सिक्युरीटी गार्ड वगैरे नेमलेला नव्हता, मात्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. एटीएम टेक्निशियन गौरव शिंदे यांनी घटनास्थळी येवून एटीएम मशीनची पाहणी केली. एटीएम ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला कपडा गुंडाळलेल्या चोरट्यांची छायाचित्रे कैद झालेली आहेत. बाजारपेठ पोलीसांच्या डिबी पथकातील अंबादास पाथरवट, निलेश बाविस्कर, सुनिल थोरात, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहूल चौधरी, दीपक जाधव, योगेश माळी, सचिन चौधरी, संदीप परदेशी, कृष्णा देशमुख यांनी धाव घेतली. चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. डिवायएसपी गजानन राठोड, पीएसआय अनिस शेख यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असून तपासाबाबत कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत इंडीयन ओव्हरसीस बँकेचे शाखा अधिकारी आशिषकुमार अनंतलाल सोनडिया (वय ३७) रा. बद्री प्लॉट यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय अनिस शेख हे करीत आहेत.दरम्यान, शहरात चोरट्यांकडून घरफोड्यांचे सत्र सुरू असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. आता चोरट्यांनी शहरातील एटीएम मशीन फोडून चोरी करण्याकडे लक्ष केंद्रीत केले असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. पोलीस प्रशासनाने वेळीच योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांधून जोर धरीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ