शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात मराठा आरक्षणासाठी टायर जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:17 IST

मानराज पार्कजवळील घटना

ठळक मुद्देएका तरुणास घेतले ताब्यातगोंधळ घातल्याचा गुन्हा दाखल

जळगाव : मराठा आरक्षणासाठी शहरातील महामार्गावरील मानराज पार्कजवळ बुधवारी दुपारी साडे तीन वाजता एका तरुणाने टायर जाळण्याचा प्रयत्न केला, त्याला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतले. राहूल सुदाम पाटील (वय २४, रा. ओमशांती नगर, पिंप्राळा, जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे.मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे बंदची हाक देण्यात आल्यानंतर शहरात मंगळवारी शांततेत बंद पाळण्यात आला. बुधवारी दुपारी साडे तीन वाजता राहूल पाटील या तरुणाने मानराज पार्कजवळ महामार्गावर कारचे तीन टायर आणले. ते पेटविण्याचा प्रयत्न केला. हा आंदोलनाचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यानंतर काही जणांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला फोनवरुन ही माहिती दिली. पोलिसांनी तातडीने महामार्ग गाठून राहूल याला ताब्यात घेतले. महामार्गावर ठेवलेले कारचे तीन टायरही पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तत्काळ धाव घेतल्याने टायर जाळण्याचा प्रयत्न असफल झाला. दरम्यान, राहूल याच्यासोबत आणखी दोन जण होते, मात्र पोलीस आल्याचे लक्षात येताच या दोन्ही तरुणांनी धूम ठोकली. दरम्यान, घटनास्थळावर फक्त एकच तरुण आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.गोंधळ घातल्याचा गुन्हा दाखलपोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम यांनी राहूल पाटील या तरुणाची चौकशी केली असता समाजासाठी आपण हे आंदोलन करीत असल्याचे त्याने स्पष्ट केले. राहूल अविवाहित असून त्याचे शिक्षण बी.कॉम झालेले आहे, तो एका कंपनीत नोकरीला आहे. पोलिसांनी त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केली. त्यानंतर सायंकाळी मद्यप्राशन करुन गोंधळ घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहूल याने मद्य प्राशन केल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाल्याची माहिती निरीक्षक रोहम यांनी ‘लोकमत’ ला दिली.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव