शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील अयोध्यानगरात 100 रुपयासाठी हल्ला, घरावर जोरदार दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 12:07 IST

तलवार, हॉकी स्टीकचा वापर

ठळक मुद्देदोन जण जखमीएकाची प्रकृती चिंताजनक

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 -  फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपये दिले नाही म्हणून ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर 25 ते 30 जणांच्या शस्त्रधारी टोळक्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजता घडली. या घटनेत मदतीसाठी आलेला राकेश प्रकाश नारखेडे (वय 23, रा.जुने जळगाव) व अभिषेक उर्फ सोनू किसन मराठे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ललित चौधरी या तरुणाने  एका फायनान्सच्या माध्यमातून मोबाईल घेतला होता. त्याचा हप्ता एक हजार 700 रुपये होता. हा हप्ता घेण्यासाठी प्रविण चंद्रकांत वाघ हा आला असता ललित याने दुपारी एक हजार सहाशे रुपये दिले व त्यातील शंभर रुपये बाकी ठेवले होते. त्यामुळे या कर्मचा:याचा ललित याच्याशी वाद झाला. त्यानंतर प्रविण वाघ हा रवी भोई, धनराज कोळी, आबु भालेराव, मोनुसिंग बावरी, संदीप वारुळे, शुभम सपकाळे,  दर्शनसिंग टाक, किरण गव्हाणे, प्रेमसिंग टाक, अविना नन्नवरे, अश्विन सोनवणे, निखिल बडगुजर व भैय्या भोई यांच्यासह 8 ते 10 जण घेऊन सायंकाळी ललित याच्या घरी आला. या टोळक्याने  थेट कुटुंबावर हल्ला चढविला. ही गर्दी पाहून मदतीला धावून आलेल्या अभिषेक व राकेश या दोघांवर जमावातील टोळक्याने तलवार हल्ला केला तर ललित याची बहिण पल्लवी कांचन येवले,  दक्ष येवले (वय 5), स्वरा (2) व प}ी भूमिका आदींनाही दुखापत झाली.एकाची प्रकृती चिंताजनकया हल्ल्यात जखमी झालेल्या अभिषेक याची प्रकृती चिंताजनक असून त्याला जिल्हा रुग्णालयातून खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे तर राकेश याच्या डोक्यात बारा टाके पडले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. या टोळक्याने घरातील सामानाची नासधूस केली असून घराच्या खिडक्या, कुलर, पलंग, पाण्याचा इलेक्ट्रीक पंप व सायकलची तोडफोड केली आहे. या टोळक्याच्या दहशतीमुळे कुटुंब भयभीत झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी उपनिरीक्षक रोहन खंडागळे, शरद भालेराव, विजय नेरकर व किशोर पाटील यांना तत्काळ घटनास्थळी रवाना केले. पोलीस आल्याचे पाहून टोळक्याने तेथून पळ काढला.   पोलिसांनी धरपकड मोहीम सुरु केल्यानंतर मुख्य आरोपी प्रविण हा हाती लागला. अन्य संशयितांचा रात्री उशिरार्पयत शोध सुरु होता. दरम्यान, याप्रकरणी संगिता विकास चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.