शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
4
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
5
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
6
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
7
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
8
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
9
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
10
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
11
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
12
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
13
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
14
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
15
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
16
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
17
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
18
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
19
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
20
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!

चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे पुजारी व ग्रामस्थांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 00:08 IST

पाटणादेवी येथे देवीच्या पुजेच्या मालकीवरून पुजारी व ग्रामस्थांमध्ये सुरू असलेल्या वादाला हाणामारीने तोंड फुटले आहे.

ठळक मुद्देपरस्परांविरुद्ध गुन्हेवाद विकोपाला

चाळीसगाव, जि.जळगाव : पाटणादेवी येथे देवीच्या पुजेच्या मालकीवरून पुजारी व ग्रामस्थांमध्ये सुरू असलेल्या वादाला हाणामारीने तोंड फुटले आहे. शुक्रवारी हा वाद विकोपाला गेल्याने परस्परांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.मंदिराचे पुजारी बाळकृष्ण जोशी हे न्यायालयात गेले. न्यायालयात त्यांच्या बाजुने निकाल लागल्याचे बोलले जाते. त्यातून पुजारी आणि ग्रामस्थांमधील वाद शमवण्याऐवजी तो हाणामारीपर्यंत पोहचल्याचे समोर आले आहे. पुजारी आणि गावकरी यांनी एकमेकांवर हाणामारीचे आरोप केले असून दोन्ही गटांकडून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला परस्परांविरोधात दिलेल्या फिर्यादेवरून गुन्हे दाखल करण्यात आला आहे.पाटणादेवी मंदिराचे पुजारी मनोज बाळकृष्ण जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पाटणादेवी मंदिरावरील पूजाअर्चा करणे तसेच दानपेटी व त्यातील उपहारासंदर्भात दाखल असलेल्या तक्रारी अर्जाचा निकाल आमच्या बाजुने लागल्याने आरोपींंना वाईट वाटल्याच्या कारणावरून शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता चंडिकावाडी गावाजवळ रस्त्यावर व पाटणादेवी येथे आरोपींनी गैरकायदा मंडळी जमवून हातात दगड विटा घेऊन मनोज जोशी यांच्या ताब्यातील चारचाकी गाडीस (एमएच-१९-सीयू-९२५७) अडवून फिर्यादी जोशी यांचे डोके गाडीच्या काचेवर आदळले व एकाने गळा दाबून चापटा बु्क्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीचे वडील बाळकृष्ण जोशी व भाऊ कमलेश जोशी यांनादेखील मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच वाहनावर दगडफेक करून नुकसान केले. या झटापटीत गळ्यातील चैन व चीजवस्तूंचे नुकसान केले.याप्रकरणी सतीश निकम, बबली निकम, नितीन बोडखे, अशोक सोनवणे, योगेश काळे, पंकज काळे, भाऊसाहेब ठाकरे, विलास सोनवणे, विजय बिडवे व शब्बीर शेख सर्व रा.पाटणादेवी यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संपत आहेर करीत आहेत.दरम्यान, राहुल भीमराव निकम रा.पाटणादेवी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता पाटणादेवी बस स्टँडजवळ काहीएक कारण नसताना मारूती कारचालक मनोज पूर्ण नाव गाव माहीत नाही. याने पाटणादेवीकडून येवून चारचाकी गाडी जोरात चालवून राहुल निकम यांना समोरून धडक दिली. त्यात राहुल निकम हा जमिनीवर फेकला गेला. त्यास छातीवर, डोळ्यावर व मानेवर मार लागला. राहूल यास धडक देणाऱ्या गाडीचा क्रमांक माहीत नव्हता. मात्र गावातील लोकांनी सदर गाडी मनोज ब्राम्हण याची होती. याप्रकरणी जखमी राहुल निकम याने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार किशोर सोनवणे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChalisgaonचाळीसगाव