चाळीसगाव, जि. जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव शिवारात बाजरीच्या शेतात काम करणा-या विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून घटनेनंतर तिघे आरोपी फरार झाले आहे. विवाहितेचे जाब - जबाब घेतल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा चाळीसगाव ग्रामीण पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.पीडित विवाहिता घोडेगाव शिवारात बाजरीच्या शेतात काम करीत असताना मंगळवारी सकाळी ११ वाजता देवसिंग रेखा चव्हाण, अंकुश देवसिंग चव्हाण, एकनाथ देवसिंग चव्हाण (सर्व रा. ढेकू ता. नांदगाव जि. नाशिक) यांच्यापैकी एकाने तिच्यावर अत्याचार केला तर अन्य दोघांनी त्याला मदत केली.पोलिसांसह महिला दक्षता समितीच्या सदस्या सोनाली लोखंडे यांनी विवाहितेचे जाब - जबाब नोंदवून घेतले. बुधवारी सकाळी विविहितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आरोपींच्या शोधार्थ तीन पथके तयार करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर पुढील तपास करीत आहे.
चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथे विवाहितेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:12 IST
बलात्काराचा गुन्हा दाखल, आरोपींच्या शोधासाठी तीन पथके
चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव येथे विवाहितेवर अत्याचार
ठळक मुद्देविवाहितेचे जाब - जबाबविविहितेची वैद्यकीय तपासणी