जळगाव - मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह चार जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुरुवारी रात्री अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चार जणांमध्ये सबनीस यांच्यासह उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव बी.बी.पाटील, उच्चशिक्षण सहसंचालक केशव तुपे, पुणे येथील उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज रघुनाथ माने यांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा व अभ्यास प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. म.सु. पगारे यांनी याबाबत फिर्याद दिली. यात त्यांनी म्हटले आहे की, सन २०११ ते आजपर्यंत आपल्याबद्दल खोटी माहिती सादर करण्यात आली आणि त्रास देण्यात आला. आपल्यामागे चौकशी लावण्यात आली पण यात काहीच निष्पन्न झाले नाही. असेही पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सबनीस यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 00:05 IST