शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणूक : जळगावात राष्टÑवादीकडून इच्छुकांची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 12:23 IST

१ जुलैपर्यंत प्रक्रिया

जळगाव : आगामी निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून राष्टÑवादी कॉँग्रेसकडून ९ विधानसभा मतदार संघातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. आॅन लाईन व आॅफ लाईनपद्धतीने हे अर्ज स्विकारले जात आहेत. यासाठी मात्र इच्छुकांकडून पाच हजाराचा पक्ष निधीही घेतला जात आहे.लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून पुन्हा नव्या जोमाने निवणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे. ११ पैकी नऊ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची या पक्षाची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात जळगाव ग्रामीण, भुसावळ, मुक्ताईनगर अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, एरंडोल-पारोळा, चोपडा या मतदार संघातून तयारीला लागण्याचे संकेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना असल्याचे सांगितले जाते. रावेर लोकसभा मतदार संघ कॉँग्रेसकडे दिल्यानंतर अमळनेर व जामनेर हे दोन मतदार संघ राष्टÑवादीकडे देण्याचे ठरल्याचे सांगण्यात आले.जिल्हाध्यक्षांच्या राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडेजिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुंबईतील बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. हा राजीनामा आपण स्वत:हून दिला असल्याचे त्यांनी सांगून याप्रश्नी काय निर्णय घ्यायचा तो प्रदेशाध्यक्ष व वरिष्ठ नेते घेतील असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.मुंबईतील बैठकीनंतर गतीपक्षाकडून देण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे जिल्हा पातळीवर पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी २५ ते १ जुलै या कालावधीत इच्छूकांकडून आॅन लाईन व आॅफ लाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जात आहेत. इच्छुकांकडून खुला प्रवर्गातील इच्छूक उमेदवार असल्यास पाच हजार व राखीव तसेच महिलांसाठी अडिच हजाराचा पक्ष निधी स्विकारला जात आहे. दाखल अर्जांनी ३ जुलैला मुंबईत छाननी होणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्यांदाच कोणताही गाजावाजा न करता पक्षाकडून ही प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

टॅग्स :Jalgaonजळगाव