शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
Rahul Gandhi : "काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
4
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?
5
'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
6
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
7
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
8
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
9
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
10
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
11
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
12
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
13
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
14
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
15
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
16
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
17
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
18
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
19
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
20
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांच्या हल्ल्यातील मारेकरी निघाला जावई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 5:45 PM

पुरुषोत्तम उर्फ बाळू पाटील यांच्यावर हल्ला करणारा मारेकरी हा त्यांचाच चुलत जावई असल्याची माहिती समोर येत आहे.

बोदवड : तालुक्यातील येवती येथील माजी सरपंच तथा काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू पाटील यांच्यावर हल्ला करणारा मारेकरी हा त्यांचाच चुलत जावई असल्याची माहिती समोर येत आहे. या जावयासह त्याच्या मित्रास पोलिसांनी पोलीस कोठडीची हवा दाखवली आहे. गजानन प्रल्हाद मुंडे (वय ४०, रा.मंगलम नगर, शेगाव, जि.बुलढाणा) असे या जावयाचे नाव आहे.पुरुषोत्तम उर्फ बाळू पाटील यांच्यावर ७ रोजी संध्याकाळी बोदवड जामठी रस्त्यावर असलेल्या साई मंदिरात  धारदार शस्त्राने गळ्यावर हातावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले होते. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. याबाबत बोदवड पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या तीन-चार तासातच पोलिसांनी आरोपींना बुलढाणा जिल्ह्यात ताब्यात घेतले. त्यात गजानन प्रल्हाद मुंडे याला पकडल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. गजानन मुंडे हा पुरुषोत्तम पाटील यांचा चुलत भाऊ रमेश पाटील यांचा जावई आहे. गजानन याचा गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. पती-पत्नीचा  हा वाद आहे. गजाननची पत्नी माहेरी होती. पती-पत्नीच्या वादाच्या प्रकरणात पुरुषोत्तम पाटील हे मध्यस्थ होते. तेच आपल्या पत्नीला नांदण्यासाठी येऊ देत नाही, असा समज गजानन याचा झाला होता. त्यातून त्याने आपला मित्र सचिन मनोहर लांडे (वय ३४, रा.पारस, ता.बाळापूर, जि.अकोला) याच्या मदतीने ७ रोजी संध्याकाळी साई मंदिर परिसरात पुरुषोत्तम पाटील यांच्यावर चाकूने वार केला. नंतर एमएच २८-३४१७ या क्रमांकाच्या दुचाकीने मित्रासह फरार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात समय सुचकता दाखवत तीन-चार तासातच आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्यावर कलम ३०७, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद केला. दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBodwadबोदवड