जळगाव, दि. 1- येथील सिमी (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया)च्या खटल्यात आसिफ खान बशीर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान (दोन्ही रा.जळगाव) या दोन्ही आरोपींना न्यायालयाने शनिवारी 10 वर्ष सक्तमजुरी व 10 हजारांचा दंड ठोठावला. फौजदारी कट कारस्थान 120 (ब) या कलमान्वये शुक्रवारी न्या.ए.के. पटनी यांनी या दोघांना दोषी ठरविले होते. त्यानंतर आज, शनिवारी या दोघांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
जळगावच्या सिमी खटल्यात आसिफ व परवेज खान यांना सक्तमजुरी
By admin | Updated: April 1, 2017 13:30 IST