जळगाव : मेहरुण व तांबापूरा भागाचा समावेश असलेल्या प्रभाग १५ मध्ये भाजपाचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी व नगरसेविका सुभद्रा नाईक यांचे पूत्र प्रशांत नाईक यांच्यात काट्याची लढत होणार आहे. या प्रभागातील माजी उपमहापौर सुनील महाजन, नगरसेविका जयश्री महाजन, शबानाबी खाटीक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे समर्थक असलेल्या माजी उपमहापौर सुनील महाजन यांचे २००८ पासून या प्रभागावर वर्चस्व आहे.मुस्लीम मतदारावर मदारतांबापूरा, मेहरुण परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग १५ मध्ये १६ हजार १४१ मतदान आहे. त्यात तब्बल सहा हजार मुस्लीम मतदार आहे.त्यापाठोपाठ १५०० लेवा पाटीदार समाजाचे मतदार आहे. लाडवंजारी समाजाचे ८०० ते ९०० मतदार आहेत. प्रत्येक पक्षाने मुस्लीम मतदारांना उमेदवारी दिली आहे.यांच्यात रंगणार लढतप्रभाग १५ अ मध्ये माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्या विरोधात भाजपाकडून मेहमूद बागवान, काँग्रेसतर्फे जाकीर बागवान यांची उमेदवारी आहे.१५ ब मध्ये नगरसेविका जयश्री महाजन यांच्या विरोधात भाजपाच्या रिजवाना खान तर समाजवादी पार्टीच्या खर्शिदबी पटेल यांची उमेदवारी आहे. १५ क मध्ये नगरसेविका शबानाबी सादिक खाटीक यांच्या विरोधात भाजपाकडून अनुसयाबाई ढेकळे, राष्ट्रवादीकडून नसरीनबी खान तर समाजवादी पार्टीतर्फे जाहेदाबी शेख यांची उमेदवारी आहे.१५ ड मधून भाजपाचे अशोक लाडवंजारी यांच्या विरोधात प्रशांत नाईक हे आहेत.या प्रभागात काँग्रेसतर्फे दीपक बाविस्कर तर राष्ट्रवादीतर्फे आसिफ शेख उमेदवारी करीत आहेत.पराभूत आजमावताहेत नशिब१५ अ मधील भाजपा उमेदवार मेहमूद बागवान, काँग्रेसचे उमेदवार जाकीर बागवान, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी गेल्यावेळी निवडणूक लढविली होती.गेल्यावेळी हे सर्व उमेदवार पराभूत झाले होते. यावेळी हे सर्व उमेदवार नशिब आजमावत आहे.एकंदरीतच या प्रभागातील सर्वच लढती रंगतदार होण्याची शक्यता असून त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जळगावात अशोक लाडवंजारी व प्रशांत नाईक यांच्यात काट्याची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 14:47 IST
मेहरुण व तांबापूरा भागाचा समावेश असलेल्या प्रभाग १५ मध्ये भाजपाचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी व नगरसेविका सुभद्रा नाईक यांचे पूत्र प्रशांत नाईक यांच्यात काट्याची लढत होणार आहे. या प्रभागातील माजी उपमहापौर सुनील महाजन, नगरसेविका जयश्री महाजन, शबानाबी खाटीक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जळगावात अशोक लाडवंजारी व प्रशांत नाईक यांच्यात काट्याची लढत
ठळक मुद्देसुनील व जयश्री महाजन, शबानाबी खाटीक यांची प्रतिष्ठा पणालाप्रभाग १५ मध्ये सर्वच गटात चुरशीची लढतमाजी उपमहापौर सुनील महाजन यांचा बालेकिल्ला