शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
3
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
4
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
5
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
6
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
7
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
8
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
9
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
10
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
11
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
12
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
13
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
14
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
15
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
16
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
17
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
18
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
19
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
20
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी

भाजप जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी अशोक कांडेलकर, हरिभाऊ जावळे, स्मिता वाघ यांच्या नावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:46 IST

खडसे-महाजन गटाचा समन्वय साधणार

जळगाव : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी चुरस राहणार असून यासाठी पक्षाकडून एकनाथराव खडसे तसेच गिरीश महाजन गटाचा समन्वय साधण्यावर भर राहणार आहे. असे असले तरी सध्या जी नावे अधिक चर्चेत आहेत, त्यामध्ये खडसे गटाच्या तिघांची नावे आघाडीवर आहेत. यात जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी आमदार हरिभाऊ जावळे तसेच आमदार स्मिता वाघ यांचा समावेश आहे.दरम्यान, या तिघांच्या नावासोबतच जि.प.चे शिक्षण सभापती पोपट भोळे, जि.प. चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जि.प.चे माजी सभापती पी.सी. पाटील, जि.प. चे माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. नवीन जिल्हाध्यक्षांची डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निवड होण्याची शक्यता असून तत्पूर्वी स्थानिक समित्यांचे गठन करण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे भाजपची संघटनात्मक बैठक होणार आहे. यासाठी जिल्हाध्यक्षांना बोलविण्यात आले आहे.जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासूनच भाजपचा बालेकिल्ला असून सध्यादेखील दोन्ही खासदार, चार आमदार भाजपचे आहेत. तसेच जि.प., जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून या मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्षपद प्रभारी आहे. त्यामुळे आता राज्यातील जिल्हाध्यक्षांसह जळगाव जिल्हाध्यक्षांचीही निवड प्रक्रिया सुरू होऊ घातली आहे.अद्याप जिल्हाध्यक्षपदाबाबत हालचाली नसल्याचे सांगितले जात असले तरी यासाठी संघटनात्मक काम करणाऱ्या चेहºयाला पसंती असण्यासह सामाजिक समीकरणे जुळविणे, भौगोलिक संतुलन राखण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खडसे-महाजन गटाचा समन्वय याविषयी चाचपणी सुरू झाली आहे.संघटनेचा प्रमुख निवडताना ‘क्लास व मास लिडर’ या दोन्ही मुद्यांचा विचार केला जातो. यात जिल्हाध्यक्षपदासाठी ‘मास लिडर’ चेहरा पाहिला जाणार आहे. त्यादृष्टीनेही चाचपणी सुरू आहे.या सर्व मुद्यांचा विचार केला तर जिल्ह्यातील वेगवेगळ््या भागातील व्यक्तींचे नावे चर्चिले जात आहे. यामध्ये मात्र गिरीश महाजन गटाचे वर्चस्व काहीसे कमी होते की काय असेही चित्र आहे. कारण जी नावे चर्चेत आहेत, त्यामध्ये खडसे गटाचे अधिक नावे आहेत. त्यानुसार पाच वर्षे जि.प. अध्यक्ष राहण्यासह जिल्हाध्यक्षपदाचा अनुभव, प्रशासकीय जाण असलेले आणि संघ परिवाराचा पगडा असलेले अशोक कांडेलकर, माजी आमदार हरिभाऊ जावळे आणि महिला अध्यक्षा म्हणून आमदार स्मिता वाघ यांचे नाव पुढे राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव