शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

विचार व संस्काराचा वारसा जपताय आशिष गुजराथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 15:38 IST

महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी घेतलेला गांधीवादी विचार, साधेपणाच्या संस्काराचा वसा आणि वारसा त्यांचे चिरंजीव आशिष गुजराथी हे चालवित आहेत.

संजय सोनवणेचोपडा : महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी घेतलेला गांधीवादी विचार, साधेपणाच्या संस्काराचा वसा आणि वारसा त्यांचे चिरंजीव आशिष गुजराथी हे चालवित आहेत. लहानपणापासून शिक्षण घेण्याच्या विद्यार्थी दशेत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले अरुणभाई गुजराथी यांचे शिक्षण स्कॉलरशिपवर झाले. चिकाटी आणि मेहनत हा स्वभावगुण अरुणभाई यांच्या अंगी आहे.बी.कॉम. आॅनर्स चे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी १९६८ साली मुंबई येथे सी.ए.चे शिक्षण घेतले. घरचा उद्योग सांभाळण्याचा निर्णय अरुणभाई गुजराथी यांनी घेतला. यासाठी ते चोपड्यात परत आले.अरुणभार्इंचा वसा आणि वारसा जपण्याचे काम चिरंजीव आशिष गुजराथी हे करित आहेत. आशिष यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण पुणे येथून पूर्ण केले. त्यांनी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समधून अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे. घरचा उद्योग महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात आणि पंजाब या राज्यांमध्ये विखुरलेला होता. म्हणून त्याच उद्योगातही सक्रिय झाले जसे अरुणभाई मुंबई येथून घरी परत आले तसेच कौटुंबिक उद्योगात सहभागी होण्याचे आशिष यांनी ठरविले. उद्योगाची ओळख व्हावी म्हणून १९९६ मध्ये राजकोट जिल्ह्यातील जसदन या गावी जिनिंग आणि प्रेसिंग उद्योगाची उभारणी केली. पुन्हा बडोदरा जिल्ह्यातील माकन या गावी दुसऱ्या फॅक्टरीची उभारणी सन १९९७ मध्ये केली. सन २००५ मध्ये शिरपूर येथे कापड मिलची स्थापना केली. शासकीय योजनांचा नीटनेटका अभ्यास करून उद्योग उभारण्यासाठी उपयोग करून घेणे हा आशिष गुजराथी यांच्यातील गुण आहे. चोपडा येथे २०१० साली खासगी बाजाराची स्थापना त्यांनी केली. सन २०१५ मध्ये शिरपूर येथे सूतगिरणी सुरू केली.यासोबतच त्यांनी रोटरी क्लबचे सहप्रांतपाल म्हणून काम पाहिले आहे. चोपडा शहरात साहित्य चळवळ कायम राहावी म्हणून नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष म्हणून ते काम करीत आहेत. खान्देश जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग चे ते संस्थापक कार्याध्यक्ष आहेत . अरुणभाई गुजराथी यांच्या कार्यशैली प्रमाणेच आशिष यांच्या कामाची पद्धत आहे. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून अरुणभाई गुजराथी यांनी आपला ठसा उमटविला. त्यानंतर राष्टÑवादी काँग्रेस पक्षात त्यांनी पक्ष वाढीसाठी मोलाची भूमिका बजावली. आजही ते कामात झोकून देतात. त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच आहे.

टॅग्स :LokmatलोकमतJalgaonजळगाव