लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रामेश्वर कॉलनी येथील रेणुका नगरात रेखा पिंटू भालेराव (वय ४०, मूळ रा.जळके, ता. जळगाव) या मजुरी करणाऱ्या महिलेच्या घराला सोमवारी सकाळी नऊ वाजता अचानक आग लागली. क्षणातच संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाली. हे दृश्य पाहून रेखा भालेराव यांनी प्रचंड आक्रोश केला.
रेणुका नगरातील रहिवासी भिकन निंबा चौधरी यांनी गच्चीवर पार्टेशनचे घर तयार केलेले होते. त्या घरात रेखा भालेराव व यांचा मुलगा मनोज व नितीन यांच्यासह सहा महिन्यांपासून भाड्याने वास्तव्याला होत्या. बांधकामाच्या ठिकाणी मजुरी काम करून त्या संसाराचा गाडा हाकतात. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता त्या दोन्ही मुलांना घेऊन गाडेगाव येथे बांधकामाच्या ठिकाणी कामावर गेल्या. तेथे पोहोचताच त्यांना घराला आग लागण्याचा निरोप मिळाला. तेथून लगेच घरी धावत आल्या, तोपर्यंत संपूर्ण घरातील भांडीकुंडी, धान्य व कपडे आदी साहित्य जळून खाक झाले होते. वरच्या मजल्यावर तुटलेले भांडे व कोळसा दिसत होता, हे चित्र पाहून त्यांना मोठा धक्का बसला. शेजारील मनीषा पाटील व इतर महिलांनी रेखा यांना धीर दिला व मदतीचे आश्वासन दिले.
मुलांच्या लक्षात आली घटना
दरम्यान, आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर धूर व आगीचे लोड निघत असल्याचे घर मालकाच्या मुलांच्या लक्षात आले आणि धावाधाव झाली. लोकांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविली.
अग्निशमन बंब येईपर्यंत घर जळून खाक
रामेश्वर कॉलनीतील रेणुका नगरात ज्या ठिकाणी आग लागली तिथे पोहोचायला अग्निशमन दलाच्या बंबाला अडथळ्यांची शर्यत करावी लागली. ज्या गल्लीतील रस्ता होता त्या गल्लीत मंडप टाकलेला असल्याने बंबाला फेरा पडला. बंब येईपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले होते. शेजारी, नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली.
डब्यातील रोकड खाक
रेखा भालेराव यांनी रामेश्वर कॉलनीत भिशी लावली होती. त्याचे पाच हजार रुपये ॲल्युमिनियमच्या डब्यात ठेवले होते. या आगीत ॲल्युमीनियमचे डबे वितळून खाक झाले असून, रोकडही त्यात जळाली आहे. त्याशिवाय खाण्यापिण्याचे धान्य व कपडेदेखील जळालेले आहेत.
गॅस सिलिंडर बाहेर काढले