शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने जामीन नामंजूर केल्याने कारागृह बंदीने गिळला खिळा!

By सागर दुबे | Updated: November 4, 2022 12:30 IST

आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध गुरूवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव :  न्यायालयाने जामीन नामंजूर केले म्हणून २६ वर्षीय बंदीवानाने जिल्हा कारागृहात बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या दरम्यानात घडली. चेतन पितांबर सोनार असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या बंदीवानाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध गुरूवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन सोनार हा २४ ऑगस्ट २०२० पासून जिल्हा कारागृह येथे भादंवि ३५४, ३७६, पोस्को अंतर्गत न्यायालयाच्या आदेशाने बंदी आहे. गुरूवारी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास त्याने कारागृहातील बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कारागृह शिपाई अरविंद म्हस्के यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच ही बाब तुरूंग अधिकारी संतोष पवार यांना कळविली.

पवार यांनी बंदी चेतन सोनार याची विचारपूस केल्यावर त्याने न्यायालयाने जामीन नामंजूर केला म्हणून खिळा गिळून घेतल्याचे सांगितले. पवार यांनी लागलीच रूग्णवाहिका बोलवून बंदीवानाला जिल्हा कारागृहात उपचारार्थ नेले. एक्स-रे रिपोर्ट काढल्यावर बंदीवानाने खिळा गिळल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तुरूंग अधिकारी संतोष पवार यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चेतन सोनार याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव